जेएन्यूमधील देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांचे आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले !

जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशद्रोही घोषणा दिल्याप्रकरणी देहली पोलिसांनी विशेष न्यायालयात प्रविष्ट केलेले आरोपपत्र न्यायालयाने फेटाळले, तसेच देहली पोलिसांची कानउघाडणीही केली.

भाजप सरकार हटवणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य ! – ममता बॅनर्जी

आमच्यासाठी राजकारणातील इतर प्रश्‍न गौण आहेत. भाजप सरकार हटवणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे प्रतिपादन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. कोलकाता येथील ब्रिगेड मैदानावर नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या महासभेत त्या बोलत होत्या.

देहली आणि उत्तरप्रदेश राज्यांत २२ धर्मांध महिला आतंकवादी सक्रीय

सुरक्षायंत्रणांच्या सतर्कतेमुळे आतंकवादी संघटनांकडून आता आतंकवादी कारवायांसाठी धर्मांध महिलांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. याचाच एक भाग म्हणून देहली आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये २२ धर्मांध महिला आतंकवादी सक्रीय आहेत, असे वृत्त ‘जागरण’ या वृत्तसंकेतस्थळाने प्रसारित केले आहे.

लोकशाहीचा गळा घोटणार्‍या बंगालमध्ये सध्या लोकशाही वाचवण्याच्या बाता मारल्या जात आहेत ! – पंतप्रधान

ज्या बंगालमध्ये राजकीय पक्षांना कार्यक्रम करण्यावर बंदी घालून लोकशाहीचा गळा घोटला जातो, तेथेच सध्या लोकशाही वाचवण्याच्या बाता मारल्या जात आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. ते दमण आणि दीवमधील सिल्वासा येथील जाहीर सभेत बोलत होते.

भारताने राफेल विमानखरेदीची ५० टक्के रक्कम चुकती केली !

भारतीय संरक्षणदलासाठी ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी ५९ सहस्र कोटी रुपयांपैकी ३४ सहस्र कोटी रुपये रक्कम चुकती केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ या कालावधीत राफेल विमाने भारताला मिळणार आहेत.

म्हापसा येथे एका मासात ३ गायींची अमानुषपणे हत्या

हणजूण येथे फ्ली मार्केटजवळ मागील एका मासात ३ गायींची अमानुषपणे हत्या केली गेली; मात्र या गायींच्या हत्यार्‍याला शोधण्यास पोलिसांना अपयश आले आहे………

उत्तरप्रदेश सरकारकडून सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण लागू !

केंद्र सरकारने सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी यांत १० टक्के आरक्षण घोषित केल्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने हे आरक्षण लागू केले आहे………

लिंगायत समाजाचे गुरु महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांचा १११ व्या वर्षी देहत्याग

लिंगायत समाजाचे गुरु तथा कर्नाटकमधील तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांनी २१ जानेवारी या दिवशी वयाच्या १११ व्या वर्षी देहत्याग केला. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते.

विविध कार्यक्रमांत विषय मांडतांना आपले बोलणे आध्यात्मिकदृष्ट्या प्रभावी होऊन ते उपस्थितांच्या अंतर्मनात जाण्यासाठी स्वतःचे साधनाबळ वाढवा !

सर्वत्रच्या वक्त्यांसाठी सूचना

संघनेत्यांची हत्या करण्यासाठी जिहादी आतंकवाद्यांना ४ कोटी रुपयांची सुपारी

दक्षिण भारतातील संघनेत्यांची हत्या करण्यासाठी जिहादी आतंकवाद्यांना ४ कोटी रुपयांची सुपारी दिल्याचे अटकेतील जिहादी आतंकवाद्यांच्या चौकशीत उघड झाले.


Multi Language |Offline reading | PDF