हंपी उत्सव साजरा करण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचा ‘हात’ श्री विरुपाक्षेश्‍वर मंदिराच्या दानपेटीत !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! हिंदूंनो, सरकारी खर्चाने हिंदुद्वेषी टीपू सुलतानची जयंती साजरी करणार्‍या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडे हिंदूंचे उत्सव साजरे करण्यासाठी पैसा नसतो, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘संघ बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतो !’ – मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे मंत्री गोविंद सिंह यांचे हिंदुद्वेषी विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्रे सिद्ध करण्याचे, स्फोट करण्याचे, हातगोळा सिद्ध करण्याचे, तसेच बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतो, असे हिंदुद्वेषी विधान मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे सहकारमंत्री गोविंद सिंह यांनी केले.

माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांचे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील व्याख्यान रहित होऊनही त्यांची भाषणबाजी !

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील अनुमती नसतांनाही राज्यघटनेवर बोलणार होते, हा विनोदच नव्हे का ? असे नियमबाह्य वर्तन करणारे कोळसे-पाटील यांनी न्यायमूर्तीपदावर असतांना कशाप्रकारचे निकाल दिले असतील ?

१० दिवसांत ४ कार्यकर्त्यांच्या हत्यांमुळे भाजप संतप्त

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या चालू असलेल्या हत्यासत्रांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात आहेत.

हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनानंतर खारघर (नवी मुंबई) येथे अंनिसचा विनाअनुमती होणारा कार्यक्रम रहित

नवी मुंबई, खारघर, सेक्टर १२ येथील गोखले शाळेच्या मैदानात २० जानेवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेच्या वतीने ‘चमत्कारामागील विज्ञान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राममंदिर व्हावे, अशी भाजपची इच्छा नाही ! –  महंत नरेंद्रगिरी महाराज, अध्यक्ष, अ. भा. आखाडा परिषद

कुंभमेळ्यानंतर अयोध्या येथे संतांची बैठक होणार !

कर्नाटकात काली नदीमध्ये बोट उलटून ८ जणांचा मृत्यू

कर्नाटकच्या कारवार येथे काली नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला, तर अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. बेपत्ता प्रवाशांचा बचाव पथकाकडून शोध चालू आहे.

पौष पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर ६० लक्ष भाविकांनी केले पवित्र स्नान

पौष पौर्णिमेच्या निमित्ताने कुंभमेळ्यात २१ जानेवारीला त्रिवेणी संगमावर कल्पवासी म्हणजेच भाविक यांचे दुसरे स्नानपर्व उत्साही आणि भावपूर्व वातावरणात पार पडले. एकूण ६० लक्ष भाविकांनी ‘गंगा माता की जय’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत त्रिवेणी संगमावर स्नान केले.

निरपराध हिंदूंना आणि सनातनला गोवण्यासाठी पैसे पुरवणारे हात कुणाचे ? – सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा परखड प्रश्‍न 

सनातनला गोवण्यासाठी अनेकांना लक्षावधी रुपयांची आमीषे दाखवली गेली. सनातनला गोवण्यासाठी पैसे पुरवणारे हे हात सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील मलिदा खाणार्‍यांचे आहेत कि ज्या नास्तिकतावाद्यांच्या कारभारातील भ्रष्टाचाराची लक्तरे सनातनने चव्हाट्यावर आणली त्यांचे आहेत ?

सभेला आमचे अवश्य सहकार्य राहील ! – केंद्रीयमंत्री अनंत गीते

हिंदु जनजागृती समितीचा हिंदु राष्ट्र-जागृती सभा उपक्रम चांगला आहे. या सभेला आमचे अवश्य सहकार्य राहील. येथील शिवसेनेच्या प्रतिनिधींना मी तशा सूचना देतो, असे मनोगत केंद्रीयमंत्री श्री. अनंत गीते यांनी व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF