उत्तरप्रदेशात हिंदु युवकाची गोळ्या घालून हत्या करणार्‍या धर्मांध युवकाला संतप्त जमावाने ठार मारले !

शहरातील गोविंदगंज बाझार येथे नुकतेच एका धर्मांध युवकाने हिंदु युवकाची गोळी झाडून हत्या केली. धर्मांध युवक घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतांना संतप्त जमावाने त्याला मारहाण केली. त्यात तो ठार झाला.

पोलिसांनी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राला अद्याप केजरीवाल सरकारची अनुमती नाही !

‘जेएन्यू’त (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी पटियाला हाऊस न्यायालयात नुकत्याच प्रविष्ट केलेल्या आरोपपत्राला अद्याप देहलीच्या केजरीवाल सरकारने अनुमती दिली नाही.

शबरीमला प्रकरणी विहिंप देशव्यापी आंदोलन करणार !

शबरीमला प्रकरणी विहिंप देशव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती विहिंपचे महामंत्री मिलिंद परांड यांनी दिली. राममंदिराविषयी येथे होणार्‍या धर्मसंसदेत साधू-संत जो निर्णय घेतील, त्याआधारे पुढील कार्याची दिशा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

गोवा मुक्तीलढ्याचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागा अन्यथा काळे झेंडे दाखवू ! – गोवा सुरक्षा मंच

जनमत कौलाचे जनक मानले जाणारे डॉ. जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचे अनावरण करतांना नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी ‘गोवा मुक्तीपेक्षा जनमत कौल मोठा’, असे वादग्रस्त विधान केले होते. मंत्री सरदेसाई यांच्या या विधानाचा गोवा सुरक्षा मंचने निषेध केला आहे.

जोधपूर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

जोधपूरच्या पोलो मैदानावर नुकतेच आंतरराष्ट्रीय माहेश्‍वरी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. आलेने संस्थेचे संचालक श्री. गोविंदजी माहेश्‍वरी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

‘अमूल’ आस्थापनाच्या साहाय्याने पारंपरिक आंबिल पेय बाजारात विक्रीसाठी आणण्याची वडोदरा येथील एम्.एस्. विश्‍वविद्यालयाची सिद्धता

प्राचीन काळापासून आरोग्यासाठी शेतकरी घेत असलेले ‘आंबिल’ हे पेय ‘अमूल’ या आस्थापनाच्या साहाय्याने बाजारात विक्रीसाठी आणण्याची सिद्धता एम्.एस्. विश्‍वविद्यालयाने चालवली आहे. हे पेय घेतल्याने निराशा न्यून होते तसेच पोटातील आतड्यांचे कार्य सुधारते, असे विश्‍वविद्यालयाने सांगितले आहे.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या नवी मुंबईतील भूमीच्या व्यवहारांची सिडकोच्या वतीने चौकशी होणार

कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईतील ओवे (खारघर) येथे दिलेल्या भूमीच्या व्यवहारांची चौकशी होणार आहेे. या भूमीला कोट्यवधी रुपयांचा भाव असल्याने खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार झाल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या आहेत…..

छत्रपती शिवाजी महाराजांचे कामाचे व्यवस्थापन आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देते ! – अभिनेता राहुल सोलापूरकर

छत्रपती शिवाजी महाराजांचे काम करण्याचे व्यवस्थापन आयुष्य जगण्यासाठी आजही प्रेरणा देते. युद्धतंत्रातून प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांनी विजय साध्य केला. संधी आहे, ती शोधा. हेच त्यांनी त्यांच्या चरित्रातून सांगितले, असे विधान चित्रपट अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केले.

ही महाआघाडी कि ‘देशबिघाडी’ ?

मोदी सरकारच्या विरोधात १९ जानेवारी या दिवशी बंगाल येथे १३ राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून उभारलेल्या महाआघाडीचा महामेळावा पार पडला………….

हिंदूंच्या परंपरांमध्ये न्यायालय आणि सरकार यांनी हस्तक्षेप करू नये ! – व्ही.एस्. कोकजे, केंद्रीय अध्यक्ष, विश्‍व हिंदु परिषद

हिंदूंच्या परंपरा आणि मान्यता यांमध्ये न्यायालय आणि सरकार यांनी हस्तक्षेप करू नये, असे प्रतिपादन विहिंपचे केंद्रीय अध्यक्ष व्ही.एस्. कोकजे यांनी कुंभनगरीतील सेक्टर १४ येथील अशोक सिंघल नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.


Multi Language |Offline reading | PDF