काँग्रेसशासित मध्यप्रदेशमध्ये भाजपचे नेते मनोज ठाकरे यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

मध्यप्रदेशमधील सेंधवा जिल्ह्यातील भाजपचे नेते मनोज ठाकरे यांची २० जानेवारीला अज्ञातांनी हत्या केली. वलवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज ठाकरे हे ‘मॉर्निंग वॉक’ला गेले असता अज्ञात आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

भाजप सरकार राममंदिराविषयी अध्यादेश काढेल, असे वाटत नाही ! – विहिंप

भाजप सरकार राममंदिराविषयी अध्यादेश काढेल, असे वाटत नाही, असे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी येथे केले.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे सविस्तर वृत्त वाचा लवकरच…

विहिंपकडून रामनवमीपासून राममंदिर उभारण्यास प्रारंभ होणार !

विहिंप येत्या रामनवमीपासून राममंदिर उभारण्याचा शुभारंभ करणार आहे. त्यासाठी रणनीती निश्‍चित करण्यात आली आहे. विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्मसभेत या रणनीतीची घोषणा करण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यानंतर अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

कुंभमेळा झाल्यावर मी स्वतः अयोध्येत जाऊन राममंदिर उभारण्यासाठी शिलान्यास करणार आहे, असे प्रतिपादन ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज यांनी केले.

भाजपशासित उत्तरप्रदेशमधील अलीगड मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार मौलवी बनण्याचे प्रशिक्षण !

अलीगड मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थ्यांना मौलवी बनण्याचे प्रशिक्षण देणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून याविषयीचा अभ्यासक्रम चालू करण्यात येणार आहे.

काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही, यामागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण समजून घ्यायला हवे ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

अय्यप्पा मंदिरात तेथील प्रथा-परंपरा तोडून काही महिलांनी प्रवेश केला. ज्यांनी प्रवेश केला, त्या महिला श्रद्धा, भक्ती यांच्या जवळपास तरी आहेत का ? केवळ काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही. त्यामागेही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे, हे समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.

सैन्यदलातील जेवणाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणार्‍या सैनिकाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

सैन्यदलातील जेवणाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून, त्याविषयी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिणारे सैनिक तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. रोहित यादव (वय २२ वर्षे) असे मुलाचे नाव असून त्याचा मृतदेह रेवाडीच्या शांती विहार परिसरातील घरात आढळला. याप्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF