हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना पर्याय नाही ! – डॉ. नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. ते दहिन्दुले येथे नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते…..

अकोला जिल्ह्यात झालेल्या लहान हिंदु राष्ट्र-जागृती सभांनाही उत्तम प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जानेवारी मासात पाच लहान हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आल्या. प्रचंड थंडी असूनही ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या या सभांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

राममंदिराच्या उभारणीसाठी भांडुप येथे ‘रामनामाचा गजर’ !

श्रीरामजन्मभूमी अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या ‘रामनामाचा गजर’ या मोहिमेच्या अंतर्गत १२ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता हनुमान मंदिर, गावदेवी मार्ग, भांडुप पश्‍चिम येथे सामूहिक नामजप करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक समायोजन प्रक्रिये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ! – परशुराम उपरकर, मनसे

ज्यांनी कधीही अध्यापनासाठी शाळेची पायरी चढली नाही, अशांना नवीन शिक्षक म्हणून नियुक्त्या दिल्या आहेत,असा आरोप मनसेचे प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

गणित चुकले म्हणून विद्यार्थ्याला काठीने मारणार्‍या शिक्षकाला अटक

गणित चुकले म्हणून आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने मारणार्‍या ‘ट्रॉम्बे’ येथील शिक्षकाला अटक करण्यात आली. प्रदीप भंडारी (वय ३६ वर्षे) असे या शिक्षकाचे नाव असून तो खासगी शिकवणी घेतो.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत अग्नीसुरक्षा या विषयावर प्रश्‍नमंजुषा

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना ‘अग्नीमुळे होणारे अपघात आणि अग्नीसुरक्षा’ या विषयावर ‘नॅशनल बर्न हॉस्पिटल, ऐरोली’ यांच्या वतीने प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती.

आता परत ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल ‘अनुत्तीर्ण’ देण्याची अनुमती !

शिक्षण हक्क कायदा वर्ष २००९ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवी यांच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावणार्‍यांना अनुत्तीर्ण (नापास) करण्याची अनुमती देण्यात येणार आहे…..

दर्जेदार शिक्षणाचे ‘गणित’ सुटेना !

‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करणारा वर्ष २०१८ चा ‘असर’ अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. हा अहवाल भारताच्या दयनीय शैक्षणिक स्थितीवर प्रकाश टाकणारा अन् शिक्षण विभागाला चपराक लगावणारा आहे.

सातारा येथे भरदुपारी हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाची हत्या

कोडोली (सातारा) येथील हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा सम्राट विजय निकम (वय २७ वर्षे) यांची १५ जानेवारीला भरदुपारी ४ वाजता डोक्यात धारदार शस्त्राने वार करून दत्तचौकानजीक हत्या करण्यात आली.

देशात मुंबईचा समुद्र सर्वाधिक प्रदूषित !

देशातील इतर किनारपट्ट्यांपैकी मुंबईच्या किनारपट्टीलगतच्या समुद्रात सर्वाधिक म्हणजे प्रतीचौरस किलोमीटर क्षेत्रात १३१.८५ किलो प्लास्टिक आढळून आले असल्याचे ‘केंद्रीय समुद्री मत्स्योद्योग संशोधन संस्थे’च्या (सीएम्एफ्आर्आय) अभ्यासात आढळले आहे.


Multi Language |Offline reading | PDF