कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कुंभमेळ्याचे शास्त्र सांगून अध्यात्मप्रसार

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रयागराज येथे पहिल्या राजयोगी स्नानाच्या वेळी कुंभमेळ्याचे महत्त्व आणि शास्त्र फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून समिती अन् संस्थेच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला उपस्थित साधू-संत तथा भाविक यांनी प्रतिसाद दिला.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला साध्वी सरस्वतीजी यांची भेट

येथील कुंभमेळ्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सेक्टर १५, मोरी मार्ग येथे लावण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक यांच्या प्रदर्शनास छिंदवाडा, मध्यप्रदेश येथील सनातन धर्म प्रचार सेवा समितीच्या अध्यक्षा साध्वी सरस्वतीजी यांनी १४ जानेवारीला सदिच्छा भेट दिली.

राममंदिर उभारण्याच्या हिंदूंच्या मागणीपुढे केंद्र सरकारला झुकावेच लागेल ! – जगद्गुरु हंसदेवाचार्य

राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अथवा अध्यादेश काढावा, असे प्रतिपादन जगद्गुरु स्वामी हंसदेवाचार्य महाराज यांनी ११ जानेवारीला येथे केले. ते म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने ‘राममंदिराचे सूत्र आमच्या प्राथमिकतेत नाही’, असे सांगून ३ मिनिटांच्या सुनावणीत पुढील ३ मासांची दिनांक दिली आहे.

उत्तरप्रदेश सरकारकडे बॉम्ब निकामी करणारे स्वतःचे पथकच नाही ! – मध्यप्रदेशातील एक पोलीस

उत्तरप्रदेश सरकारने कुंभमेळ्यासाठी साडेचार सहस्र कोटींहून अधिक निधी खर्च केला आहे; मात्र राज्यात जिवंत बॉम्ब सापडल्यास त्याला नष्ट करणारे सुसज्ज आणि तज्ञ पथक नाही. त्यामुळे आम्ही त्यासाठी मध्यप्रदेशातून आलो आहेत.

कुंभक्षेत्री कचर्‍याच्या डब्यांवर ‘नमामि गंगे’चा उल्लेख करून देवी गंगेचे प्रशासनाकडून विडंबन !

कुंभमेळ्याच्या ठिकाणी प्रशासनाने भाविकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र हे करतांना काही ठिकाणी प्रशासनाकडूनच गंगा देवीचे विडंबन करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या परिसरात कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कचर्‍याच्या डब्यांवर ‘नमामि गंगे’ असा उल्लेख केला आहे.

कुंभमेळ्यातील अपप्रकार !

कुंभमेळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी एका दूरचित्रवाहिनीच्या छायाचित्रकाची (कॅमेरा) बॅटरी संपल्यावर वाहिनीच्या प्रतिनिधींनी बॅटरी प्रभारीत (चार्ज) करण्यासाठी जवळ असलेल्या विद्युत् तारांना बॅटरीच्या तारा जोडून चुकीच्या पद्धतीने वीजप्रवाह घेतला होता.

तुटीतील ‘बेस्ट’ (?)

लोकलगाड्यांप्रमाणेच मुंबईची वाहिनी असलेल्या बेस्टचा (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट) संप १६ जानेवारीला म्हणजे ९ व्या दिवशी उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर मिटला.

शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या २ महिलांना २ सहस्र भाविकांनी रोखले

शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या २ महिलांना भाविकांनी रोखले. १६ जानेवारीला सकाळी ही घटना घडली. किमान २ सहस्र भाविकांनी त्यांना रोखले. या दोघींनी ‘दर्शनाविना आम्ही जाणार नाही’, असे सांगितले.

‘श्रद्धा’, ‘निष्ठा’ अन् ‘भक्ती’ असलेल्या तेजोमय ‘निरंजन’ची महती ।

‘पौष शुक्ल पक्ष एकादशी, म्हणजे १७.१.२०१९ या दिवशी श्री. निरंजन चोडणकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त मला श्रीकृष्णाने सुचवलेली कविता पुढे देत आहे.

इराणचे मालवाहू विमान कोसळून १३ जण ठार

इराणचे बोईंग मालवाहू विमान येथील विमानतळावर उतरत असतांना ते कोसळून १३ जण ठार झाले. हे विमान कोसळल्यानंतर ते धावपट्टीवर घासत गेले आणि जवळ असलेल्या भिंतीवर जाऊन आदळले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now