भारतात बहुसंख्यांकांना धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी करावी लागणे चिंताजनक ! – केंद्रीय गृहमंत्री

ब्रिटन आणि अमेरिका येथील अल्पसंख्यांक समुदाय तेथे धर्मांतरबंदी कायदा करण्याची सतत मागणी करत असतो; मात्र भारतात बहुसंख्य असलेल्या समाजालाच धर्मांतरबंदी कायदा करण्याची मागणी करावी लागते, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

शबरीमला प्रकरणी केरळ सरकारचे वर्तन इतिहासात सर्वांत लज्जास्पद ! – पंतप्रधान

शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या प्रकरणात केरळ सरकारने केलेले द्वेषपूर्ण वर्तन इतिहासात सर्वांत लज्जास्पद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथे एका सभेला संबोधित करत होते.

धर्मांध पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आतंकवाद्यांना ‘भूमीपुत्र’ संबोधले !

खर्‍या भूमीपुत्रांना (हिंदूंना) ‘आतंकवादी’, तर आतंकवाद्यांना ‘भूमीपुत्र’ ठरवले जाणारा जगातील एकमेव देश भारत ! हे भाजप सरकारला लज्जास्पद ! अशा देशद्रोही विचारांच्या व्यक्तीसमवेत भाजप अनेक वर्षे सत्तेत होता !

संक्रांतीला पहूर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

येथे संक्रांतीला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण करण्यात आले. यामध्ये २ जण घायाळ झाले. त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पाकने कुरापत काढल्यास ‘जशास तसे’ उत्तर देणार ! – सैन्यदलप्रमुख बिपीन रावत

पाक सातत्याने आतंकवाद्यांना साहाय्य करत आहे. पाकच्या कुरापतींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास सैन्य डगमगणार नाही. भारत पाकला ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सिद्ध आहे, असे प्रतिपादन सैन्यदलप्रमुख बिपीन रावत यांनी केले.

इयत्ता ८ वीतील ५६ टक्के विद्यार्थ्यांना येत नाहीत सामान्य गणिते ! – ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेचा अहवाल

इयत्ता ८ वीत शिकणार्‍या देशभरातील ५६ टक्के विद्यार्थ्यांना सामान्य गणिते येत नाहीत, अशी धक्कादायक माहिती शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.

काँग्रेस, डावे आणि सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश अयोध्या प्रकरणाच्या विलंबासाठी उत्तरदायी ! – इंद्रेशकुमार, रा.स्व. संघ

अयोध्येतील रामजन्मभूमी वादातील खटल्यास विलंब होत असून या विलंबासाठी तीन जण गुन्हेगार आहेत. यात काँग्रेस आणि डावे पक्ष अनुक्रमे पहिल्या अन् दुसर्‍या स्थानी आहेत, तर सर्वोच्च न्यायालयाचे २ ते ३ न्यायाधीश हे तिसरे गुन्हेगार आहेत.

ब्रिटीश संसदेत ‘ब्रेक्झिट’ कराराचा प्रस्ताव बहुमताने फेटाळला

इंग्लंड युरोपीयन युनियनमधून बाहेर पडण्याच्या संदर्भात इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये मांडलेला ‘ब्रेक्झिट करारा’ला यांच्याच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या ११८ खासदारांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान करत मे यांना धक्का दिला.

कुंभमेळ्याचे जिवंत शब्दचित्रण करणारे सदर : कुंभदर्शन

हिंदु धर्मातील विविधता, विशालता, सर्वसमावेशकता, एकता आणि अखंडता यांचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणार्‍या जगाच्या पाठीवर एकमेव असलेल्या ‘कुंभमेळ्या’च्या निमित्ताने ‘कुंभदर्शन’ या विशेष सदरास आरंभ करण्यात आला आहे.

सनातनने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो ! – शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वचन

‘सनातन संस्थेने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो. सनातन संस्थेकडून राष्ट्ररक्षणाचे कार्य होवो’, असे आशीर्वचन जगद्गुरु शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यावर दिले.


Multi Language |Offline reading | PDF