सवर्ण आरक्षण कायद्याची कार्यवाही गुजरातपासून चालू

केंद्र सरकारने सर्वसाधारण वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी यांत १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला.

युवकांनो, ‘व्हॅलेंटाईन डे’ला नाकारा ! – मकरंद अनासपुरे

‘व्हॅलेंटाईन डे’ हा आपला नसून पाश्‍चिमात्यांचा आहे. युवकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला नाकारून भारतीय संस्कृतीमधील विविध सण-उत्सवांचे दिवस आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथील एका कार्यक्रमात केले.

कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्याचा भाजपचा डाव ! – कर्नाटकचे जलसिंचनमंत्री डी.के. शिवकुमार यांचा आरोप

राज्यात घोडेबाजार चालू असून आमचे ३ आमदार मुंबईतील हॉटेलमध्ये भाजपच्या नेत्यांसमवेत आहेत. कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष)-काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ चालू आहे, असा आरोप कर्नाटकचे जलसिंचनमंत्री तथा काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केला.

मन:शक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय गर्भसंस्कार परिषद

स्वामी विज्ञानानंद यांच्या २५ व्या कृतज्ञतास्मरण वर्षाचे निमित्त साधून मन:शक्ती प्रयोगकेंद्राने अमेरिकेतील APPPAH (Association for Pre & Perinatal Psychology & Health)  या संस्थेसह १८ ते २० जानेवारी या कालावधीत भारतातील पहिल्या गर्भसंस्कार आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोगकेंद्रात केले आहे.

मुंबईत २ नायजेरियन तस्करांना अटक

अंधेरीतील एका नामांकित शाळेबाहेर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या २ नायजेरीयन तस्करांना मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएन्सी) अटक केली. त्यांच्याजवळून ६ कोटी ३ लाख रुपये मूल्याचे १ किलो कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला.

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला नोंदणी का नाही ?’ – प्रकाश आंबेडकर

प्रत्येक संघटनेला नोंदणी आवश्यक आहे. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला का नाही ? मोहन भागवत बंदूक घेऊन फिरतात, त्यांच्यावर कारवाई नाही. आम्हाला आणि संघाला वेगवेगळा कायदा का ? वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यानंतर संघाने नोंदणी न केल्यास त्यांच्यावर बंदी घालून कारागृहात पाठवू, अशी चेतावणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

भोर (पुणे) येथे महिलांना मंदिरात बसवून केले मासिक पाळी व्यवस्थापनाचे समुपदेशन

महाविद्यालयीन उपक्रमांमधून हिंदूंच्या धार्मिक भावना डिवचण्याचे प्रयत्न केले जातात, याचा प्रत्यय सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत घेतलेल्या उपक्रमाद्वारे आला.

राजस्थान येथील हिंदु युुवतीला ‘ब्लॅकमेल’ करून तिचे धर्मांधाकडून अपहरण

येथील एका १८ वर्षांच्या युवतीचे श्रीनगरच्या कुपवाडा येथील धर्मांध गुलजार याने ९ मासांपूर्वी अपहरण केले. गुलजार याने अश्‍लील छायाचित्राद्वारे धमकावून तिला घर सोडण्यास भाग पाडले होते………….

आपत्काळात सनातनचे सर्वत्रचे साधक आणि आश्रम यांचे रक्षण होण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारावर ऐरावत गजमूर्तींची स्थापना !

सनातनचे सर्वत्रचे साधक आणि सर्व आश्रम यांचे रक्षण व्हावे, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार १५ जानेवारीला सकाळी येथील सनातन आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते २ ऐरावत गजांच्या मूर्तींची विधीवत स्थापना करण्यात आली.

शबरीमलाची परंपरा मोडणार्‍या महिलेला सासूकडून मारहाण : रुग्णालयात भरती

शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोटातील महिलांना प्रवेशबंदी असतांना ही परंपरा बिंदू आणि कनकदुर्गा या ५० वर्षे वयाच्या आतील महिलांनी नुकतीच मोडली.


Multi Language |Offline reading | PDF