प्रयागराज येथील कुंभमेळ्यास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ !

विश्‍वातील सर्वांत मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महापर्व ! १ कोटी ४० लाख भाविकांनी केले स्नान

असा हा प्रयागतीर्थावरील अमृतस्नानाचा मेळा ! – श्री. चेतन राजहंस

पापांचे परिमार्जन आणि मोक्षप्राप्ती हा गंगास्नानाचा पाया आहे. धर्मशास्त्रात म्हटले आहे की, ज्याची जशी श्रद्धा असेल, तसे त्याला फळ मिळते. . . .असा अमृतस्नानाचा महिमा आहे. त्यासाठी भरणारा स्नानार्थींचा मेळा आम्ही ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवला !

सनातन संस्थेच्या वतीने साधू-संतांचे स्वागत : साधूंकडून सनातनचा जयघोष

येथील पहिल्या राजयोगी स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या शोभायात्रा वाजत-गाजत त्रिवेणी संगमावर निघाल्या. त्या वेळी सनातनच्या साधकांनी हातात फलक धरून त्यांचे स्वागत केले.

(म्हणे) ‘मुसलमानांनाही १० टक्के आरक्षण द्या !’ – मायावती

केंद्र सरकारने नुकतेच सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी यांत १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला.

पाकच्या ‘स्नायपर्स’च्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी हुतात्मा

सीमारेषेवरील सांबा सेक्टरमध्ये पाकच्या ‘स्नायपर्स’कडून (दूर अंतरावरून शत्रूला लक्ष्य करणे) करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी हुतात्मा झाला.

कर्नाटकमध्ये २ अपक्ष आमदारांनी कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढला

कर्नाटकमध्ये २ अपक्ष आमदारांनी जेडीयू-काँग्रेस युतीच्या सरकारचा पाठिंबा काढला. एच्. नागेश आणि आर्. शंकर अशी या आमदारांची नावे असून त्यांनी सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र राज्यपालांकडे सुपुर्द केले.

न्यायाधीश सुटीवर असल्याने आरोपपत्रावरील सुनावणी लांबणीवर

येथील वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूमध्ये) देशद्रोही घोषणा दिल्या गेल्याच्या प्रकरणात देहली पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रावरील सुनावणी न्यायाधीश सुटीवर असल्याने १९ जानेवारीपर्यंत लांबणीवर पडली.

नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) येथे साडेचार टन गोमांस आणि जनावरे जप्त

शहरातील कुरेशी गल्लीतील एका घरावर छापा मारून पोलिसांनी साडेचार टन गोमांस आणि जिवंत जनावरे कह्यात घेतली आहेत.

दोष-अहं यांवर मात करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:पासूनच आरंभ करणार !

पनवेल येथे १३ जानेवारी या दिवशी कृष्णभारती सभागृहात दुपारी २ ते सायंकाळी ७.३० या कालावधीत हिंदूसंघटन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत १० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. कार्यशाळेत ‘स्वत:मध्ये असलेल्या दोष-अहंचे निर्मूलन कसे करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

चिनी आणि नायलॉन मांजा यांचा उपयोग करणार्‍यांवर कारवाई करणार ! – मुंबई पोलीस

पक्षी, प्राणी यांसह मनुष्याच्या जिवाला धोकादायक ठरणार्‍या चिनी आणि नायलॉन मांजांची विक्री करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. ती झुगारून नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा उपयोग करतांना आढळल्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अंतर्गत जामीनपात्र गुन्हा नोंद होऊ शकतो………


Multi Language |Offline reading | PDF