कन्हैया कुमार, उमर खालिद, अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह १० जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट

देहलीतील जेएन्यूमध्ये देशद्रोही घोषणा दिल्याचे प्रकरण

प्रयागराज येथे आज कुंभमेळ्यातील पहिले राजयोगी (शाही) स्नान !

प्रयागराज येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला कुंभमेळ्यातील पवित्र गंगा-यमुना-सरस्वती या त्रिवेणी संगम तिरावर पहिले राजयोगी (शाही) स्नान होणार आहे. या राजयोगी स्नानासाठी विविध आखाड्यांचे संत, महंत आणि भाविक यांनी मोठ्या उत्साहात सिद्धता केली आहे.

नक्षलप्रेमी आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधातील गुन्हा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

कोरेगाव-भीमा दंगलीतील सहभाग आणि नक्षलवाद्यांशी संबंध या आरोपांच्या प्रकरणात आनंद तेलतुंबडे यांच्या विरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

जगभरातील सर्व धर्मस्थळांना न्याय मिळत असतांना रामजन्मभूमीवर अन्याय का ? – इंद्रेशकुमार, रा.स्व. संघ

अमृतसर, व्हॅटिकन, काबा, बुद्धगया अशा जगभरातील सर्व धर्मस्थळांना नेहमीच न्याय मिळत आला आहे. मग रामजन्मभूमीवरच अन्याय का ?, असा प्रश्‍न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी उपस्थित केला

धर्मांतरबंदी कायदा महाराष्ट्रातही लागू करा ! – हिंदूंची एकमुखी मागणी

दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या धर्मांतराच्या भस्मासुराविरुद्ध एकत्र येऊन ख्रिस्ती मिशनर्‍यांना रोखण्याचा एकमुखी निर्धार करत १४ जानेवारीला उल्हासनगर येथे मोर्चा काढण्यात आला.

सीबीआयचे हंगामी संचालक नागेश्‍वर राव यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

सीबीआयचे हंगामी संचालक एम्. नागेश्‍वर राव यांच्या नियुक्तीला ‘कॉमन कॉज्’ या स्वयंसेवी संस्थेने अधिवक्ता प्रशांत भूषण यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

मूळच्या गुजरात येथील उशीर पंडित-दुरांत बनल्या न्यूयॉर्क न्यायालयाच्या न्यायाधीश

मूळच्या कर्णावती (गुजरात) येथील असलेल्या आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या उशीर पंडित-दुरांत यांची न्यूयॉर्क न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली. त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून न्यायाधीशपदाची शपथ घेतली.

सरकारने तात्काळ कायदा करून अयोध्या येथे भव्य राममंदिर उभारावे !

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे आहेत. न्यायालयात पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे पुन्हा सिद्ध झाले ….

आनंदप्राप्तीसाठी साधना करा ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सध्या मनुष्य सुख मिळवण्यासाठी धडपडत आहे; मात्र भौतिकतावादी जगात सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी साधना करावी लागते. त्यामुळेच मनुष्याची आध्यात्मिक उन्नती होते आणि त्याला जीवनाचा सर्वोच्च आनंद मिळू शकतो……


Multi Language |Offline reading | PDF