पाकला संवेदनशील माहिती पुरवणार्या सैनिकास अटक
आयएस्आयच्या ‘हनीट्रॅप’मध्ये अडकून पाकला सैन्यदलाची संवेदनशील माहिती पुरवणार्या सैनिकाला ११ जानेवारी या दिवशी राजस्थान पोलिसांनी जैसलमेर येथून अटक केली.
आयएस्आयच्या ‘हनीट्रॅप’मध्ये अडकून पाकला सैन्यदलाची संवेदनशील माहिती पुरवणार्या सैनिकाला ११ जानेवारी या दिवशी राजस्थान पोलिसांनी जैसलमेर येथून अटक केली.
धर्मप्रेमींमध्ये वीरश्री निर्माण करणार्या आणि धर्मद्रोह्यांना धडकी भरवणार्या जळगाव येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेला सहस्रावधी हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती लाभली.
येथे श्री विठ्ठल दर्शनाच्या ‘ऑनलाइन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय १२ जानेवारी या दिवशी झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला, अशी माहिती साहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
कन्नड भाषेतील ‘सनातन पंचांग २०१९’ हे सर्वांत लोकप्रिय ‘अॅप’ ठरले आहे. ‘दैनिक विजय कर्नाटक’ने त्याच्या ११ जानेवारी या दिवशीच्या अंकातील ‘टेक्नॉलॉजी वार्ता’ पुरवणीमधील ‘फेवरेट अॅप्स’ या सदरात सनातन पंचांगाच्या या ‘अॅप’ची माहिती प्रसिद्ध केली आहे.
सैन्यदलाने काश्मीरमधील कुख्यात आतंकवादी झीनत उल् इस्लाम याचा चकमकीत खात्मा केला. इस्लामसह त्याचा एक साथीदारही ठार झाला. १२ जानेवारीला रात्री आतंकवादी आणि सैन्यदल यांच्यात चकमक झाली.
येथील सिद्धेश्वर संस्था आणि बागलकोट येथील बसवेश्वर वीरशैव विद्यावर्धक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच भारतीय संस्कृती उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
चर्च संस्थेने शंखवाळी (सांकवाळ) येथे पुरातत्व खात्याच्या जागेत (पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) अनधिकृतपणे उभारलेल्या अवर लेडी ऑफ हेल्थ चॅपल येथे फेस्तचे आयोजन केले आहे.
जो राजकीय पक्ष ३ लाख सरकारी कर्मचार्यांना जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करेल, त्यांनाच कर्मचार्यांच्या कुटुंबियांची मते मिळणार, असा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी सेवानिवृत्ती (पेन्शन) हक्क संघटनेने ९ जानेवारी या दिवशी घोषित केला आहे.
गुंतवणूक योजनेत अधिक व्याजाचे आकर्षण दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम् यांच्या विरोधात सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले.