हिंदू ऐक्य आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी आज ठाणे आणि जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

आज ठाणे आणि जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! हिंदूंनो, राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणार्‍या आघातांच्या विरोधात संघटित होण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावा !

कोलकाता येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे चित्रपटगृहावर आक्रमण

‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाला काँग्रेसचा विरोध – हिंदूंनी वैध मार्गाने केलेला विरोध डावलून सरकार हिंदूंच्या देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन असलेल्या चित्रपटांना अभय देते, तर काँग्रेसी टोळी थेट कायदा हातात घेऊन चित्रपटगृहाचे खेळ बंद पाडते ! यावरून ‘सरकारला हीच भाषा समजते’, असे समजायचे का ?

आलोक वर्मा यांनी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांना पसार होण्यासाठी केले साहाय्य !

केंद्रीय दक्षता आयोगाचा गंभीर आरोप – गुन्हे उघड करणार्‍यांनीच गुन्हे करणे म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे. यावरून अन्वेषण यंत्रणांचा अंतर्गत कारभार कसा चालतो, हे उघड होते !

काश्मीरमधील ३५ शीख पंच-सरपंचांचे त्यागपत्र

काश्मीरमधील पुलवामा येथे आतंकवाद्यांनी शीख सरपंचाच्या भावाची हत्या केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सरपंच आणि पंच अशा ३५ जणांनी प्रशासनाकडे त्यागपत्रे दिली.

खर्‍या आरोपींचा शोध घेण्यासाठी अन्वेषण यंत्रणा विज्ञानाचा आधार का घेत नाहीत ?

कथित विचारवंतांच्या हत्यांमधील खरे आरोपी शोधण्यासाठी स्वतःला विज्ञानवादी म्हणवणारे आणि अन्वेषण यंत्रणा विज्ञानाचा आधार घेऊन सत्य का शोधत नाहीत ? असा प्रयत्न त्यांनी केल्यास कोणता अधिवक्ता खोटे बोलतो, हेही त्यांना कळून येईल. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात १ मेजर आणि १ सैनिक हुतात्मा

राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये आतंकवाद्यांनी घडवून आणलेल्या ‘आय.ई.डी.’च्या स्फोटात १ मेजर आणि १ सैनिक हुतात्मा झाले.

फोंडा (गोवा) येथील पोलिसांकडून १५१ दिवस विलंबाने न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट !

सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर समाजकंटकांनी केलेले जीवघेणे आक्रमण

‘चीट इंडिया’ चित्रपटाच्या ‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवली !

‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवण्यात आलेल्या ‘चीट इंडिया’ या चित्रपटाचे नाव पालटून ‘व्हाय चीट इंडिया’, असे करण्यात आले आहे.

दिंड्या, सामूहिक रामनामजप, निवेदन, आंदोलन, फलकप्रसिद्धी, स्वाक्षरी मोहीम यांद्वारे सहस्रावधी रामभक्तांची राममंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी !

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी ही प्रभु श्रीरामाची जन्मभूमी आहे, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये याचे अनेक पुरावे आहेत. विविध पौराणिक स्थळे याचे साक्षीदार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF