१५० मीटर खोल झर्‍यातून येणार्‍या थेंब थेंब पाण्यातून हंडा भरण्यासाठी मध्यरात्री १ वाजल्यापासून रांगाच रांगा

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम गावातील पाणीटंचाईचे भयाण वास्तव !

गुजरातमध्ये भाजपचे नेते जयंती भानुशाली यांची धावत्या रेल्वेगाडीत हत्या

गुजरातमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जयंती भानुशाली (वय ५३ वर्षे) यांची अज्ञातांनी धावत्या रेल्वेगाडीत हत्या केली. भानुशाली भुज-दादर एक्सप्रेसने भूजहून कर्णावतीला जात होते.

आलोक वर्मा यांना हटवण्यास काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला होता विरोध !

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटवण्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी निवड समितीच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत विरोध दर्शवला होता.

आणखी एक ‘मास्टर स्ट्रोक !’

भ्रष्टाचार शोधणार्‍या सर्वोच्च यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारीच भ्रष्ट असणे, हे देशातील अराजकतेचे द्योतक आहे.

न्यायमूर्तींची रिक्त पदे भरण्याचा निर्णय तीन मासांत घ्या ! – उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींची रिक्त पदे भरण्याचे आदेश देऊनही राज्यात ४०० हून अधिक न्यायमूर्तींची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याविषयी तीन मासांत निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित भव्य वाहनफेरीने जळगाव भगवेमय !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ जानेवारी या दिवशी आयोजित सभेचा विषय शहरातील प्रत्येक हिंदु बांधवापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ११ जानेवारीला भव्य वाहनफेरी पार पडली. सकाळी साडेनऊ वाजता फेरीला नेहरू पुतळ्यापासून आरंभ झाला.

सुरक्षारक्षक सैनिकाची गोळी झाडून आत्महत्या

नौदलात सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेले सैन्य सुरक्षा दलाचे सैनिक केसर सिंग (वय ५६ वर्षे) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. कामाच्या तणावातून हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

आतंकवादी आरीब माजीद याचा तात्पुरता जामीन न्यायालयाने नाकारला

‘आयएस्आय’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित आतंकवादी आरीब माजीद याचा तात्पुरता जामीन मिळण्यासाठीचा अर्ज राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयाने नाकारला आहे. स्वत:च्या भावाच्या लग्नाला जाता येण्यासाठी माजीद याने न्यायालयात अर्ज केला होता.

नगराध्यक्षपदासाठी १५ अर्ज, तर १९ नगरसेवकपदांसाठी ११९ अर्ज

मलकापूर (कराड) नगरपंचायत निवडणुकीसाठी १० जानेवारी हा अर्ज प्रविष्ट करण्याचा अखेरचा दिवस होता. या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी १५ अर्ज, तर १९ नगरसेवकपदांसाठी ११९ उमेदवारी अर्ज प्रविष्ट करण्यात आले आहेत.

बोलणे एक आणि वागणे दुसरे असलेले गांधी !

‘भारताने भेकडासारखे असाहाय्य होऊन स्वतःचा अपमान सहन करण्यापेक्षा स्वतःच्या सन्मानाच्या संरक्षणासाठी शस्त्रांचा आश्रय घेणे मी योग्य समजतो.’


Multi Language |Offline reading | PDF