मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानचा परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ (उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्याचा प्रस्ताव

सुरक्षेच्या कारणास्तव मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान आणि ईदगाह यांचा परिसर ‘नो फ्लाइंग झोन’ (उड्डाण प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे अप्पर पोलीस महानिरीक्षक……

शंकराचार्य श्री श्री विदुशेखर भारती यांच्या वंदनीय उपस्थितीत मुलुंड येथे हिंदु संस्कृतीनुसार विधीवत हवन करून अनेकांचा वाढदिवस एकत्रित साजरा !

हिंदु संस्कृतीनुसार वाढदिवस साजरा व्हावा, यासाठी येथे मागील ३ वर्षांपासून चालू असलेल्या ‘बर्थ डे हवन’ या कार्यक्रमाला शृंगेरीपिठाचे शंकराचार्य श्री श्री विदुशेखर भारती यांची वंदनीय उपस्थिती लाभली

निवडणूक आयोगाकडे ७ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी

आगामी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाकडे ८ जानेवारी या दिवशी ७ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली. यामध्ये भारतीय विकास दल, लोकतांत्रिक जनस्वराज पक्ष, नॅशनल अवामी युनायटेड पक्ष, पूर्वांचल नवनिर्माण पक्ष…..

काळाबाजार करणार्‍या नांदेडमधील आस्थापनाला सरकारकडून शासकीय धान्य वाहतुकीचे कंत्राट

नांदेडमधील अन्नधान्य पुरवठ्याचा काळाबाजार करणार्‍या आस्थापनाला शासनाने संपूर्ण राज्यातील अन्नधान्यांची वाहतूक आणि हाताळणी करण्याचे कंत्राट दिले आहे, असा गंभीर आरोप करत प्रतिस्पर्धी आस्थापनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

केरळमधील चर्चकडून ननवर शिस्तभंगाची कारवाई !

बलात्काराचा आरोप असलेला माजी बिशप फ्रँको मुलक्कल याच्या विरोधात आंदोलन करणार्‍या नन लूसी कालापूर यांच्यावर चर्चने शिस्तभंगाची कारवाई केली. ….

अंधेरी येथील उपाहारगृहांवर टाकलेल्या धाडीतून १२ अल्पवयीन मुलांची सुटका

अंधेरी साकीनाका येथील उपाहारगृहांवर पोलिसांचे बाल न्याय हक्क विभागाचे पथक, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, तसेच कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी यांच्या साहाय्याने धाड टाकून १२ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली.

अभिनेते अनुपम खेर यांच्यासह १३ जणांवर गुन्हा नोंद करण्याचा बिहारमधील न्यायालयाचा आदेश

‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटावरून अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा नोंद करण्याचा आदेश बिहारमधील न्यायालयाने दिला. या चित्रपटातून काँग्रेसच्या नेत्यांची अपकीर्ती केली जात असल्याचा आरोप करत….

आमदारांच्या आग्रहामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना मारहाणीच्या प्रकरणी सरकार कारावासाच्या शिक्षेचा कालावधी अल्प करणार !

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी हे कामावर असतांना त्यांना मारहाण अन् दमदाटी केल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद करून ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होते. काही आमदारांच्या आग्रहामुळे या शिक्षेचा कालावधी अल्प करण्यासाठी संबंधित कायद्यात…..

काश्मीरमध्ये होत असलेल्या कथित हत्यांचे कारण पुढे करत मुसलमान सनदी अधिकार्‍याचे त्यागपत्र

भाजप सरकारविषयी खेद व्यक्त करत काश्मीरमधील सनदी (आयएएस्) अधिकारी शाह फैजल यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. काश्मीरमध्ये होत असलेल्या हत्या (?) आणि केंद्र सरकारकडून विश्‍वासार्ह राजकीय कृतीची उणीव यांमुळे त्यागपत्र देत असल्याचे त्यांनी सांगितले.

सनातनचे जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांना सूचना 

१५ जानेवारी २०१९ या दिवशी मकरसंक्रांत आहे. त्यानिमित्त ‘सनातन संस्था’निर्मित मराठी भाषेत एकूण ३ दृकश्राव्य (audio-visual) सत्संग आणि हिंदी भाषेत एकूण २ दृकश्राव्य सत्संग अनुक्रमे १५ मिनिटांचे आणि कन्नड भाषेतील ३० मिनिटांचे २ दृकश्राव्य (audio-visual) सत्संग सिद्ध करून जिल्हासेवकांना पाठवण्यात येणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF