राममंदिर प्रकरणाची सुनावणी २९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी २९ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. ५ न्यायाधिशांच्या खंडपिठातील न्यायमूर्ती उदय लळित यांनी घटनापिठातून माघार घेतली.

गंगानदी वाचवण्यासाठी भाजप सरकारने साडेचार वर्षांत काहीही केले नाही ! – जलतज्ञ राजेंद्र सिंह

‘रक्तपुरवठा’ आवश्यक असतांना सरकारने दातांवर उपचार केल्याचा आरोप

प्रयागराज येथील अतीप्राचीन अक्षयवट ४५० वर्षांनंतर हिंदु भाविकांसाठी खुला !

गेल्या ४५० वर्षांपासून येथे बंदिस्त असलेला अतीप्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेला अक्षयवट आणि सरस्वती कुप हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते भाविकांसाठी खुले करण्याची ऐतिहासिक घटना येथे १० जानेवारीला घडली.

संपूर्ण महाराष्ट्र श्रीरामनामाच्या गजराने दुमदुमला !

अयोध्येत राममंदिराची उभारणी करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने ९ आणि १० जानेवारीला ठिकठिकाणी आंदोलने, महाआरती, रामनामाचा गजर आणि पनवेल, कल्याण आणि नालासोपारा येथे नामदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट

येथील योगतज्ञ दादाजी वैशंपायन (वय ९९ वर्षे) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या मासात (डिसेंबर २०१८ मध्ये) ते कल्याण येथे आले असता सदिच्छा भेट घेतली. या वेळी नरेंद्र मोदी यांनी योगतज्ञ दादाजी यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

वादात सापडलेल्या ‘मराठी साहित्य संमेलना’चे उद्घाटन आज आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या पत्नीच्या हस्ते होणार !

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ११ जानेवारीपासून येथे प्रारंभ होणार आहे. येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, पोस्टल ग्राऊंड येथे होणार्‍या या संमेलनाची सांगता १३ जानेवारीला होणार आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना प्राप्तीकर विभागाची नोटीस

नॅशनल हेराल्ड प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना प्राप्तीकर विभागाने ३१ डिसेंबर २०१८ या दिवशी १०० कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली.

(म्हणे) ‘पुणे विद्यापिठाला शनिवारवाड्याऐवजी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा लोगो लावा !’ – डॉ. भारत पाटणकर

पुणे विद्यापिठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले असले, तरी विद्यापिठाच्या कामकाजातील कागदपत्रांवर अजूनही शनिवारवाड्याचा लोगो छापण्यात येत आहे. तो तात्काळ पालटून तेथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा लोगो ….

पिंपरीत तीन लाख दहा सहस्र रुपये किमतीचा गांजा जप्त

येथे ८ जानेवारीला २० किलो ५०० ग्रॅम वजनाचा तीन लाख दहा सहस्र रुपये किमतीचा गांजा घेऊन जाणारा विशाल रावळकर याला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now