राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी समस्त हिंदु संघटनांच्या वतीने श्रीरामनामदिंडी !

श्रीरामभक्तांचा करवीरनगरीत उद्घोष ‘एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम !’

लव्ह जिहाद रोखा अन्यथा देशातील प्रत्येक शहरात पाकिस्तान निर्माण होतील ! – भाजपचे आमदार गुलाबचंद कटारिया, उदयपूर

लव्ह जिहाद रोखा अन्यथा देशातील प्रत्येक शहरात पाकिस्तान निर्माण होतील, असे विधान भाजपचे राजस्थानमधील माजी मंत्री तथा उदयपूर येथील विद्यमान आमदार गुलाबचंद कटारिया यांनी केले.

अरुणाचल प्रदेशमधून पाकिस्तानी हेरास अटक

सैन्याच्या गुप्तचर पथकाने अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळून एका पाकिस्तानी हेरास अटक केली. निर्मल राय असे त्याचे नाव असून तो आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील रहिवासी आहे.

आरक्षण विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ : कामकाज २ वेळा स्थगित

सभागृहाचे कामकाज वारंवार स्थगित करून जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणार्‍या खासदारांची खासदारकी रहित करण्याचा जनतेला अधिकार हवा. तरच ती खरी लोकशाही म्हणता येईल अन्यथा तिला जनतेकडून मते घेऊन त्यांची कामे न करणारी ‘फसवणूकशाहीच’ म्हणावी लागेल !

दलाल ख्रिश्‍चिअन मिशेलशी असलेले संबंध काँग्रेसने स्पष्ट करावेत ! – पंतप्रधान

लढाऊ विमान करारात ख्रिश्‍चिअन मिशेलची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. मिशेल आणि काँग्रेस यांचे काय नाते आहे, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील कार्यक्रमात केला.

मराठी साहित्य संमेलन चालू होण्याच्या तोंडावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचे त्यागपत्र

११ जानेवारीपासून चालू होणार्‍या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोंडावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी त्यागपत्र दिले आहे.

रूढी आणि परंपरा यांविषयीचा अभ्यास न करता त्याला विरोध करणे पूर्णतः अयोग्य आहे ! – अश्‍विनी कुलकर्णी, प्रवक्त्या, सनातन संस्था

हिंदूंंच्या केवळ काही मंदिरांमध्येच महिलांना प्रवेश नाही. असे असतांना त्या मागील रुढी आणि परंपरा यांविषयीचा अभ्यास न करता त्याला विरोध करणे पूर्णतः अयोग्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या अश्‍विनी कुलकर्णी यांनी केले.

रामजन्मभूमीवरच मंदिर उभारण्यास न्यायालयाने अनुज्ञप्ती न दिल्यास केंद्रशासनाने अध्यादेश काढावा ! – दीपकराव गायकवाड, विहिंप

अयोध्या येथे राममंदिरासंबंधीच्या सुनावणीला न्यायालय प्रत्येक वेळी हुलकावणी देत असली, तरीही हिंदूंच्या हृदयातच श्रीराम कायम वास करून आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवरच मंदिर उभारणे ही १०० कोटी जनतेची भावना आहे. समलिंगी, शबरीमला, नक्षलवादी आदी विषयांच्या याचिकेवर तत्परतेने निवाडा होत असतांना अयोध्या निवाड्याला विलंब का होत आहे ?

छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह यांचे विचार तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील ! – युवराज कुवर लक्ष्यराज सिंह, महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज

सध्याची पिढी सोशल मीडियाची असूनही येथील इतिहास सुरक्षित आणि चांगला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापसिंह यांचे विचार तरुण पिढीला महाराणा प्रतापसिंह कलादालनाच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज मेवाड येथील युवराज कुवर लक्ष्यराज सिंह यांनी केले.

कोलवाळ (गोवा) कारागृहात कैद्यांचा मनमानी कारभार !

कोलवाळ कारागृहात कैद्यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे सातत्याने पुढे येत असले, तरी तेथील गैरप्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. कारागृहात कैदी मनमानी कारभार करत आहेत. सहकैद्यांना मारहाण करण्याचे प्रकारही सातत्याने घडत असतात.


Multi Language |Offline reading | PDF