प्रवचनाच्या वेळी दोन्ही तळहातांवर लहान आकारातील दैवी कण दिसणे आणि ते पाहून भावजागृती होणे

‘२१.११.२०१७ या दिवशी ला-पाझ (बोलिव्हिया) येथे ‘आध्यात्मिक उपाय’ या विषयावर प्रवचन होते. स्पॅनिश भाषेत घेण्यात आलेल्या या प्रवचनाला २५ जिज्ञासू उपस्थित होते. प्रवचनाच्या वेळी माझ्या दोन्ही तळहातांवर लहान आकारातील दैवी कण दिसले. ते पाहून माझी भावजागृती झाली.’

रामनाथी आश्रमातील प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत आसंदीवर बसून नामजप करत असतांना ‘आसंदीवर बसले नसून हवेतच तरंगत आहे’, असे वाटणे

आम्ही रामनाथी आश्रमात असतांना एकदा रात्री आई मला निर्गुण कक्षात, म्हणजे प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोलीत घेऊन गेली. मी तेथे एका आसंदीवर बसून नामजप करू लागले. काही वेळानंतर ‘तेथे आसंदी नसून मी हवेतच तरंगत आहे’, असे मला वाटले

निर्मळ मन

‘साधूसंत वर्षानुवर्षे बसलेले असतात; कारण त्यांचे मन निर्मळ असते. वाल्मीकिंसारखे शरिरावर वारूळ झाले, तरी मन निर्मळ असते.’

वासनाधीन असणार्‍यांची समाजसुधारणा, समाजकल्याणाची चळवळ, धडपड हे निवळ ढोंग असून ते त्यांच्या स्वार्थी वासनापूर्तीचे साधन असणे

वासनेचा ज्याला स्पर्श होत नाही, विकाराची सामग्री विनायास उपलब्ध असतांनाही, तो अविचल असतो, विकार ज्याच्या आसपासही भटकू शकत नाहीत, तोच समाजाचे कल्याण करू शकतो.


Multi Language |Offline reading | PDF