(म्हणे) ‘विचारवंतांच्या हत्या करणार्‍या गटाला सनातन प्रभातचे माजी संपादक कै. शशिकांत राणे यांनी पैसे पुरवले !’

अन्वेषणात काहीही हाती न लागल्याने राष्ट्र आणि धर्म यांसाठी आयुष्य समर्पित करणार्‍या सनातन प्रभातच्या माजी संपादकांची मानहानी करणारे कर्नाटकातील विशेष अन्वेषण पथक !

सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर

सर्वसाधारण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी यांत १० टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी ८ जानेवारी या दिवशी १२४ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले.

आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल !

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा केंद्र सरकारच्या केंद्रीय दक्षता आयोगाचा (‘सीव्हीसी’चा) निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला. या निर्णयामुळे आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी पुनर्नियुक्ती झाली आहे.

इस्लाम पंथात चिनी संस्कृतीच्या मूल्यांचा समावेश करण्यासाठी चीन सरकारने केला नवा कायदा !

इस्लाम पंथात चिनी संस्कृतीच्या मूल्यांचा समावेश करण्यासाठी चीन सरकारकडून नवा कायदा करण्यात आला आहे, अशी माहिती चीनमधील सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने दिली.

(म्हणे) ‘१० सहस्र खोल्यांमधील कुठल्या खोलीत श्रीराम जन्माला आले, ते कसे कळणार ?’

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांचे हिंदुद्वेषी फुत्कार ! वैचारिक सुंता झालेला एक फुटकळ माणूस भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करूनही त्याच्यावर कारवाई न करणे भाजप सरकारला लज्जास्पद ! असे सरकार म्हणे हिंदुत्वनिष्ठ !

बांगलादेशातील जिहाद्यांकडून हिंदु मंदिरात तोडफोड

बांगलादेशमधील तंगेल जिल्ह्यातील बात्रा गावामध्ये जिहाद्यांनी मंदिरात घुसून तोडफोड केली. तसेच या मंदिराची उभारणी करणारे श्री. चित्तरंजन यांच्या कुटुंबावर आक्रमण करून त्यांच्या घराची नासधूस केली.

राममंदिर खटल्यासाठी ५ सदस्यीय घटनापिठाची स्थापना : १० जानेवारीला सुनावणी

राममंदिराच्या खटल्यावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापिठाची स्थापना करण्यात आली आहे.

विशाखापट्टणम् येथे ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम् शहरात गुजराती समाजासाठी नुकतेच ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले….

मुदतबाह्य औषधसाठा केल्याच्या प्रकरणी साहाय्यक पशूवैद्यकीय अधिकारी दोषी

शेतकर्‍यांच्या दुभत्या जनावरांसह शेळी आणि जनावरे यांचे संवर्धन, तसेच विविध आजारांचे निदान करण्यासाठी शासनाकडून पुरवण्यात येणार्‍या लाखो रुपयांच्या औषधांचा साठा करून त्याची विक्री करत मुदतबाह्य औषधसाठा केल्याप्रकरणी तुंबाड येथील साहाय्यक पशूधन अधिकारी आर्.एस्. जाधव दोषी असल्याचे चौकशी अहवालाअंती स्पष्ट झाले आहे………


Multi Language |Offline reading | PDF