तेलंगणमधील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांचा एम्आयएम् पक्षाचे हंगामी अध्यक्ष अहमद खान यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यास नकार

एम्आयएम् पक्ष सतत हिंदूविरोधी विधाने करत असल्याने घेतला निर्णय ! ‘निधर्मी’ भारतात असे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार असणे म्हणजे ‘काळ्या ढगाला सोनेरी कड’ म्हणावी लागेल ! सिंह यांनी देशभरातील लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे !

भाजप सरकार आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देण्याची तरतूद केवळ १० वर्षांसाठी केली होती. आज ७० वर्षे उलटून गेली, तरी आरक्षण कायम राहिले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या भूमिकेतून आरक्षण संपवायला हवे !

जेएनयूतील श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमास विद्यार्थी संघटनेचा विरोध !

येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूमध्ये) एका कार्यक्रमासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ या विद्यापिठातील साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेने ८ आणि ९ जानेवारी या दिवशी संप पुकारला आहे.

राममंदिर उभारण्यासाठी देशभरात रामनामाचा गजर करणार ! – हिंदु जनजागृती समिती

राममंदिर उभारण्याचा संकल्प करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून प्रभु श्रीरामालाच साकडे घालण्यात येणार असून राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदु जनजागृती समिती देशभरात रामनामाचा गजर करणार आहे, अशी माहिती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

(म्हणे) ‘देशातील परिस्थितीची भारतीय म्हणून लाज वाटायला हवी !’ – इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल

जिहादी आतंकवाद, गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आदी हिंदूंवरील आघातांविषयी नयनतारा सहगल यांना लाज वाटत नाही का ?

सनातन पंचांगामुळे सनातन धर्माविषयी आस्था वाढून विश्‍वात सुख-शांती नांदेल ! – श्रीमत् जगद्गुरु रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज

सनातन पंचांगामुळे संपूर्ण विश्‍वात आपल्या महान संस्कृतीचा प्रचार-प्रसार होईल. आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचेल. त्याची माहिती सर्वांना होईल. – श्रीमत् जगद्गुरु रामानंदाचार्य श्री हंसदेवाचार्यजी महाराज

कुंभमेळ्यात अडीच सहस्रांहून अधिक आध्यात्मिक संस्थांना प्रशासनाने जागा नाकारली !

सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही हिंदु जनजागृती समितीला जागा नाकारली !

शिवछत्रपतींच्या पावनभूमीत हिंदु राष्ट्राचा जयघोष !

प्रौढप्रतापपुरंदर, गोब्राह्मणप्रतिपालक, क्षत्रियकुलावतंस श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी रायगडमध्ये कालगतीनुसार पुन्हा एकदा हिंदु राष्ट्रासाठी संघटित होण्याची हाक देणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा पौष शुक्ल पक्ष प्रतिपदेस, म्हणजेच ६ जानेवारी या दिवशी पनवेलनगरीत आयोजित करण्यात आली होती !

हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामात लढलेल्या हिंदूंचे बलीदान लक्षात ठेवून जागृत व्हा अन् हिंदु राष्ट्राची मागणी करा ! – रमेश शिंदे

हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामात लढलेल्या हिंदूंचे बलीदान लक्षात ठेवून जागृत व्हा अन् हिंदु राष्ट्राची मागणी करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तांदुर शहरातील …..


Multi Language |Offline reading | PDF