कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे १२ कोटी भाविक उपस्थित रहातील !  सुरेश खन्ना, शहरविकासमंत्री, उत्तरप्रदेश

कुंभमेळ्याला देश-विदेशातून १५ कोटी भाविक उपस्थित रहातील, असा अंदाज उत्तरप्रदेशचे शहरविकासमंत्री सुरेश खन्ना यांनी व्यक्त केला. प्रयागराज येथे १५ जानेवारीपासून चालू होणार्‍या कुंभमेळा २०१९ ची माहिती देण्यासाठी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

शबरीमला मंदिराविषयीच्या भाविकांच्या श्रद्धांचा सन्मान करायला हवा ! – इस्रोचे माजी शास्त्रज्ञ जी. माधवन नायर

शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांनी प्रवेश न करण्याची तेथील लोकांची परंपरा आणि श्रद्धा आहे. याचा प्रत्येकाने सन्मान करायला हवा. यासाठी कोणत्याही कायद्याची आवश्यकता नाही. मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख यांच्यामध्येही अशा परंपरा आहेत. सरकार किंवा न्यायालय त्यांच्या प्रथांमध्ये कधी नोंद देते का ?…………

मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी सापळे लावणार्‍या ५ आरोपींना अटक

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये (फिल्मसिटीमध्ये) ३१ डिसेंबर या दिवशी बिबट्या आणि सांबर हे वन्यप्राणी मृतावस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वन विभागाने चित्रनगरी, तसेच आरे वसाहतीतील ५ जणांना अटक केली आहे.

सर्वांना आरक्षण दिल्यावर युवकांना नोकर्‍या मिळणार नाहीत ! – मुख्यमंत्री

सगळ्या समाजाला आरक्षण दिल्यावर ९० टक्के युवकांना नोकरी मिळणार नाही. सरकारी नोकर्‍या उपलब्ध राहिलेल्या नाहीत. आरक्षणाचा नोकर्‍या मिळण्यात लाभ होणार नाही, हे आता परखडपणे सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पाकमधील पेशावर येथील ‘पंज तीरथ’ धार्मिक स्थळ ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून घोषित

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांताच्या सरकारने पेशावरमधील प्राचीन हिंदु धार्मिक स्थळ ‘पंज तीरथ’ला ‘राष्ट्रीय वारसा’ म्हणून घोषित केले आहे. येथे असणार्‍या ५ सरोवरांमुळे याला ‘पंज तीरथ’ असे नाव पडले आहे. येथे मंदिरही आहे.

आंध्रप्रदेश सरकारकडून ३० बेरोजगार ब्राह्मण तरुणांना चारचाकी गाड्या

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये ३० बेरोजगार ब्राह्मण युवकांना ‘स्विफ्ट डिझायर’ या चारचाकी वाहनांचे वाटप केले. या गाड्यांच्या किमतीपैकी प्रत्येकी २ लाख रुपये ब्राह्मण वेल्फेअर कॉर्पोरेशनकडून देण्यात येणार आहेत……….

ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहूर्तमेढ रोवली ! – देवेंद्र फडणवीस

सावित्रीबाई फुले यांच्या नावाने त्यांच्या जन्मगावी नायगाव (सातारा) येथे महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येईल. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे राज्याला पुरोगामी म्हणून ओळख प्राप्त झाली. या दांपत्यानेच महाराष्ट्रात पुरोगामित्वाची मुहूर्तमेढ रोवली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पाकला मिळणारे १.३ अब्ज डॉलरचे साहाय्य बंद करणार ! – ट्रम्प यांची घोषणा

पाकिस्तानसह आम्हाला पुष्कळ चांगले संबंध हवे आहेत; पण तो शत्रूंना (जिहादी आतंकवाद्यांना) थारा आणि आश्रय देत आहे. त्यामुळे चांगले संबंध प्रस्थापित होत नाहीत………….

‘सुवर्ण न्यूज’ वृत्तवाहिनीच्या संपादकांनी केलेल्या पैगंबर यांच्या अवमानाचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे ! – कर्नाटकचे गृहमंत्री एम्.बी. पाटील

‘सुवर्ण न्यूज’ वृत्तवाहिनीचे संपादक अजीत हनुमक्कनवर यांच्याकडून प्रेषित पैगंबर यांची निंदा झाली आहे, असा आरोप करत राज्यात अनेक ठिकाणी तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘राज्यशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे’, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री एम्.बी. पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात मंत्री यु.टी. खादर यांनी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

निवृत्ती वेतन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे सरकार आणि पुणे जिल्हाधिकारी यांना २५ सहस्र रुपयांचा दंड !

पतीचे निधन झाल्यानंतर सातत्याने पत्रव्यवहार करून आणि नंतर आदेश निघूनही रखमाबाई कृष्णाजी नेहेरे (वय ८० वर्षे) यांना निवृत्ती वेतन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ‘सरकारी प्रशासनाचा हा भोंगळ कारभार आहे’ असे निरीक्षण एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी नोंदवले.


Multi Language |Offline reading | PDF