केरळमध्ये भाजप खासदार आणि माकप आमदार यांच्या घरांवर बॉम्बफेक

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ए.एन्. शमसीर यांच्या निवासस्थानावर बॉम्ब फेकण्यात आला. या वेळी शमसीर घरी नव्हते. या घटनेच्या काही वेळेनंतर भाजप नेते आणि राज्यसभेतील खासदार व्ही. मुरलीधरन् यांच्या घरावरही काही अज्ञातांनी गावठी बॉम्ब फेकला.

ऑगस्टा वेस्टलँड आस्थापनाला काळ्या सूचीतून बाहेर काढण्यामागे भाजपचे नेते !

‘ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर’ खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) अटकेत असलेला दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल याने चौकशीत आता भाजपच्या एका नेत्याचे नाव घेतले आहे

रेल्वे मंत्रालयाने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत अधिभार केला रहित !

येथे लवकरच प्रारंभ होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने भाविकांसाठी रेल्वेच्या तिकिटावर लावलेला अधिभार रहित केला आहे. मंत्रालयाकडून या आशयाचे एक लेखी पत्र हिंदु जनजागृती समितीला नुकतेच प्राप्त झाले.

युद्धासाठी सज्ज रहा ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

चीन सध्या अनेक अडचणी आणि आव्हाने यांचा सामना करत आहे. अशा वेळी चिनी सैन्याने युद्धासाठीची सिद्धता अधिक गतीने केली पाहिजे, असा आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चिनी सैन्याला दिला आहे.

राममंदिर आणि शबरीमला मंदिर यांविषयी भाजप अन् संघ परिवार यांची भूमिका मृदुंग दोन्ही बाजूने वाजवण्यासारखी !

राममंदिर आणि शबरीमला मंदिरांविषयीची भाजप आणि संघ यांची दुटप्पी भूमिका श्री. ठाकरे यांनी या अग्रलेखातून उघड केली आहे.

कुंभमेळाक्षेत्र असलेल्या प्रयागराजचे आध्यात्मिक माहात्म्य !

१४ जानेवारी २०१९ पासून प्रयागराज येथे चालू होणार्‍या अर्धकुंभाच्या निमित्ताने…
प्रयाग हे उत्तरप्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती  (ही नदी अदृश्य आहे.) यांच्या पवित्र अशा ‘त्रिवेणी संगमा’वर वसलेले तीर्थस्थान आहे. या पवित्र संगमामुळेच याला ‘प्रयागराज’ किंवा ‘तीर्थराज’ असे म्हटले जाते……………

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती

‘६ जानेवारी !’ मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा दिवस ‘मराठी पत्रकारदिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आचार्य जांभेकर यांना विनम्र अभिवादन !

एकांगी दृष्टीचे पत्रकार कधी समाजाला खर्‍या बातम्या देऊ शकतील का ? अशांना ‘चांगले पत्रकार’ म्हणता येईल का ?

‘अनेक मुले आणि तरुण साधना करण्यासाठी सनातनच्या आश्रमांत येतात. हल्लीचे पत्रकार केवळ त्यांच्या आई-वडिलांच्या मुलाखती घेऊन ‘सनातनवाले मुलांना पळवतात’, असे आरोप सनातनवर करतात.

सनातनची पत्रकारिता

सनातनच्या राष्ट्र अन् धर्म निष्ठ पत्रकारितेचा परिचय करून देणारा ग्रंथ !
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !

वैभववाडी येथे आज महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह कलादालनाचे उद्घाटन

महापराक्रमी थोर युगपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या जीवनाशी निगडित देशातील दुसरे आणि महाराष्ट्र राज्यातील पहिले कलादालन आणि सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन ६ जानेवारी या दिवशी होणार आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now