पनवेल येथे जोशपूर्ण वातावरणात भव्य वाहन फेरी !

‘लाना होगा लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’।, ‘कौन चले रे कौन चले हिंदु राष्ट्र के वीर चले ।’ अशा क्षात्रतेजयुक्त घोषणा ४ जानेवारीला पनवेल शहरात संध्याकाळी दुमदुमल्या… ! निमित्त होते हिंदु जनजागृती समितीप्रणीत हिंदुत्वनिष्ठांनी काढलेल्या वाहनफेरीचे !

मुंबईतील हवेची गुणवत्ता ३ जानेवारीला अधिक खालावल्याची ‘सफर’ या संस्थेकडून नोंद !

थंडी वाढल्याने होणारी तापमानातील घट आणि वाढते धुके यांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ३ जानेवारीला अधिक खालावली. या दिवशी अंधेरी येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४११ पीएम् म्हणजे धोकादायक स्तरापर्यंत पोहोचला, तर नवी मुंबईत तो ३२२ पीएम् या अत्यंत वाईट स्तरापर्यंत नोंदवला गेला.

पर्यटक पोलिसांची सासष्टी किनारपट्टीवर मद्याशिवाय सहल जागृती मोहीम

केळशी ते माजोर्डा या सासष्टी तालुक्यातील किनारपट्टीवर मद्याशिवाय सहल करण्याविषयी पर्यटक पोलीस नागरिकांमध्ये जागृती करत आहेत. गोवा शासनाने सार्वजनिक स्थळांवर मद्यप्राशन करण्यावर बंदीचा अध्यादेश अजून काढलेला नाही. हा अद्यादेश कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकतो.

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली संभाजीनगर येथील चि. निविका निखिल तिवारी !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष त्रयोदशी (३.१.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करणार्‍या डॉ. आरती तिवारी यांची भाची (भावाची मुलगी) संभाजीनगर येथील चि. निविका निखिल तिवारी हिचा वाढदिवस झाला.

हॉटेलच्या महागड्या दरांमुळे गोवा हे एक महागडे पर्यटनस्थळ म्हणून अपकीर्त ! – मनोहर आजगावकर, पर्यटनमंत्री

हॉटेलच्या महागड्या दरांमुळे पर्यटन क्षेत्रात गोवा हे एक महागडे पर्यटनस्थळ म्हणून अपकीर्त होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन टुरिस्ट ट्रेड कायद्यात पालट करून हॉटेलमधील खोलीचे भाडे आकारण्यावर नियंत्रण आणणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली आहे.

विविध आस्थापने आणि लीजधारक यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे २ सहस्र कोटी रुपये थकवले !

विविध आस्थापने आणि लीजधारक यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम्एम्आर्डीए) अनुमाने २ सहस्र कोटी रुपये थकवले आहेत.

भारतात असहिष्णुता असल्याचा कांगावा करत पुरस्कार परत करणार्‍या इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार !

येथे ११ जानेवारीपासून चालू होणार्‍या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन इंग्रजी भाषेतील साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार आहे. या देशात असहिष्णुता असल्याचा कांगावा करत स्वतःचा पुरस्कार परत करणार्‍या १० ….

शिसेयुक्त ‘मॅगी’ आम्ही का खावे ? – ‘नेस्ले इंडिया’ आस्थापनाला सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

‘नेस्ले इंडिया’ या परदेशी आस्थापनाच्या ‘मॅगी’ या खाद्यपदार्थामध्ये शिसे असल्याचा खटला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा चालू झाला आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांनी ‘शिसेयुक्त मॅगी आम्ही का खावे?’ असा प्रश्‍न विचारला.

असा अभ्यास भारतात पुरोगामी, गोमांसप्रेमी का करत नाहीत ?

जर गोमांस खाणे बंद केले गेले, तर जागतिक स्तरावर २.४ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण न्यून होईल, असे जागतिक आर्थिक परिषदेच्या अभ्यासातून समोर आले आहे

स्वास्थ्य के लिए हानिकारक गोमांस खाना छोडा, तो विश्‍व में मृत्यु की दर २.४  प्रतिशत घट जाएगी ! – वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम

क्या गोमांस खानेवाले इसपर ध्यान देंगे ?

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now