राममंदिरासाठी न्यायालयाच्या निर्णयाची जगाच्या अंतापर्यंत वाट पहायची का ? – विहिंप

राममंदिराच्या उभारणीच्या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाची जगाच्या अंतापर्यंत वाट पाहायची का ?, असा प्रश्‍न विश्‍व हिंदु परिषदेने येथे पत्रकार परिषद घेऊन विचारला.

शबरीमला मंदिरात २ महिलांचा गुपचूप प्रवेश

भाविकांच्या धार्मिक भावना दुखावून करण्यात आलेल्या या मंदिरप्रवेशाने आणि त्यातून घेतलेल्या कथित ‘दर्शना’ने  पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, अन्य धर्मीय आनंदी झाले असतील; मात्र या कर्माचे परिणाम आध्यात्मिक कर्मफलन्यायाप्रमाणे संबंधितांना भोगावे लागतील, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

हिंदुद्रोही प्रा. भगवान यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून टाळाटाळ

प्रभु श्रीरामचंद्र यांचा ‘दारूडा’ आणि ‘मांसाहारी’ असा पुस्तकात उल्लेख
तक्रार नोंदवण्यास गेलेल्या अधिवक्त्यांचा अवमान

नरभक्षक वाघाचे नाव ‘मुस्तफा’ ठेवल्याने संतप्त मुसलमानांकडून नाव पालटण्याची मागणी

येथील मुस्तफाबाद गावामध्ये एका नरभक्षक वाघाचे नाव ‘मुस्तफा’ ठेवण्यात आल्याने मुसलमान संघटनांकडून विरोध होत आहे. या संघटनांनी  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन वाघाचे नाव पालटण्याची मागणी केली आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणावरून लोकसभेत काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप

‘राफेल प्रकरणात घोटाळा झाला’, अशी ओरड करत काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले; मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळल्याने हा निर्णय काँग्रेसच्या जिव्हारी लागला ! आता काहीही करून या प्रकरणात घोटाळा झाल्याचे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस अशा प्रकारे आटापिटा करत आहे !

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी वर्ष २००९ पासून आक्रमणाचे नियोजन करत होते !

देहली आणि उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आलेले इस्लामिक स्टेटचे आतंकवादी वर्ष २००९ पासून देहलीमध्ये आत्मघातकी आक्रमणे आणि बॉम्बस्फोट करण्याचे नियोजन करत होते, अशी स्वीकृती या कटातील मुख्य सूत्रधार मुफ्ती सुहैल याने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या चौकशीत दिली.

मोदी यांनी दिलेली किती आश्‍वासने पूर्ण केली ?

मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांपैकी किती आश्‍वासने त्यांनी पूर्ण केलीत, हे त्यांनी सांगितलेच नाही, अशी टीका मोदी यांच्या मुलाखतीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. मोदी यांची विशेष मुलाखत १ जानेवारीला दूरचित्रवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आली होती.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलिसाची घरात घुसून हत्या

पुलवामा जिल्ह्यातील हंसान पायीन या भागात जिहादी आतंकवाद्यांनी समीर मीर या पोलिसाच्या घरात घुसून केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षादलांनी परिसरात आतंकवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबवली आहे.

अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे इस्लामिक स्टेटच्या दोघा आतंकवाद्यांच्या ५ ठिकाणांवर धाडी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे पुन्हा एकदा धाड घातली. ३१ डिसेंबरच्या रात्री येथील ५ ठिकाणी धाड घालण्यात आली. २६ डिसेंबरला अटक करण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटच्या १० आतंकवाद्यांपैकी दोघांच्या ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या.


Multi Language |Offline reading | PDF