गिरगाव चौपाटी येथे पोलिसांची बोट बुडाली; मात्र ६ कर्मचारी वाचले

गिरगाव चौपाटी येथे ३१ डिसेंबरला पोलिसांची एक बोट बुडाली; मात्र त्यातील ६ पोलीस कर्मचार्‍यांना वाचवण्यात यश आले. ३१ डिसेंबरनिमित्त येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी कर्तव्य बजावत असतांना पोलिसांची बोट बुडाली.

गुजरातमध्ये आता शाळेत हजेरीसाठी ‘येस सर’ ऐवजी ‘जय हिंद’ बोलण्याचा नियम लागू

गुजरातच्या भाजप सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात हजेरी (उपस्थिती) नोंदवतांना ‘येस सर’ अथवा ‘येस मॅडम’ म्हणण्याऐवजी ‘जय हिंद’ किंवा ‘जय भारत’ म्हणत हजेरी लावावी, असा आदेश दिला आहे.

कब्रस्तानच्या जागेतील उद्यानासाठीचे आरक्षण उठवण्याची खासदार उदयनराजे भोसले यांची सूचना

येथील बुधवार नाका परिसरात कब्रस्तान आहे. येथील मोकळी जागा सातारा नगरपालिकेच्या वतीने वर्ष २००१ मध्ये उद्यानासाठी आरक्षित करण्यात आली होती. हे आरक्षण उठवण्यासाठी मुसलमान समाजाच्या वतीने खासदार छत्रपती …..

आधुनिकांनी हिंदु धर्मावर उडवलेले शिंतोडे पुसताच हिंदु बांधवांना आपली धर्मस्मृती पुन्हा प्राप्त होईल !

आता हिंदुत्वाऐवजी ‘भारतीयत्व’ आले. वैदिक वा सनातन हिंदु संस्कृती नव्हे, तर आमचे आधुनिक बांधव ‘भारतीय संस्कृती’ म्हणू लागले. मोठमोठ्यांना आज ‘हिंदु’ म्हणवून घेण्याची लाज वाटते; म्हणून आमचेच बांधव आमच्यावर उलटून पडत आहेत. हे आमचे पराकाष्ठेचे मानसिक अधःपतन आहे.

सातारा नगरपालिकेच्या विषय समित्या सभापतींच्या निवडी ७ जानेवारी या दिवशी !

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी सातारा नगरपालिकेच्या विषय समितींच्या सभापतींच्या निवडी ७ जानेवारी २०१९ या दिवशी घेण्याचे ठरवले आहे.

‘पालिका आपल्या दारी’ अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक १ ची नगराध्यक्षांकडून पाहणी

नगरपालिकेच्या वतीने ‘पालिका आपल्या दारी’ हे अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष थेट नागरिकांच्या दारात जात आहेत.

शिर्डी येथे साईमंदिराकडे निघालेल्या पदयात्रेकरूंवर दगडफेक करणार्‍या मद्यपींवर गुन्हा नोंद

शिर्डी येथे श्रीसाई मंदिराकडे निघालेल्या पदयात्रेकरूंवर काही मद्यपींनी दगडफेक करत महिलांसमवेत छेडछाड केली. याप्रकरणी मद्यपींवर ३९५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पालखीतील पदयात्रेकरूंनी काही वेळ शिर्डी पोलीस ठाण्यात ठिय्या घातला.

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. श्रीयन देशपांडे (वय २ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

काळेवाडी येथील श्री. पंकज देशपांडे यांचा मुलगा चि. श्रीयन (वय २ वर्षे) हा महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेला दैवी बालक असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे, अशी आनंदवार्ता पुणे जिल्ह्याच्या जिल्हासेविका कु. वैभवी भोवर यांनी दिली.

शिर्डीत साईमंदिरात केले ख्रिस्ती नवीन वर्ष साजरे !

शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या लोकांकडून साईमंदिरात ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यात आले. या वेळी रात्री १२ वाजता उपस्थित लोकांनी साईंचा जयघोष केला. साईबाबांच्या सुवर्ण कलशावर आतषबाजी करण्यात आली.

फिलिपिन्समधील बॉम्बस्फोटात २ ठार, तर ३० जण घायाळ

दक्षिण फिलिपिन्समधील एका मॉलच्या प्रवेशद्वारावर ३१ डिसेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटात २ जण ठार, तर ३० जण घायाळ झाले.


Multi Language |Offline reading | PDF