शबरीमला मंदिर प्रवेशासाठी केरळ सरकारकडून महिलांची मानवी साखळी

सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय दिला असला, तरी भाविकांच्या विरोधामुळे अद्याप १० ते ५५ वयोगटातील एकही महिला मंदिरात प्रवेश करू शकलेली नाही.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा रत्नागिरी येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदूंनी राममंदिरासाठीच भाजपला केंद्रात आणि उत्तरप्रदेशमध्येे निवडून दिले आहे; मात्र राममंदिरासाठी विश्‍व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा आंदोलन करत आहे. राममंदिरासाठी ३० वर्षे केलेल्या आंदोलनानंतर झालेल्या जागृतीमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत……….

सनातन संस्था करत असलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य प्रशंसनीय ! – राकेशगिरीजी महाराज, मध्यप्रदेश

उत्तरप्रदेश येथील प्रयागराज येथे जानेवारी २०१९ मध्ये होणार्‍या कुंभमेळ्यात अध्यात्मप्रसारासाठी सनातन संस्थेच्या वतीने प्रदर्शन मंडपाची उभारणी चालू आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी प्रदर्शन मंडप उभारणीची सेवा चालू असतांना तेथे भगवे वस्त्र घातलेल्या दोन संतांचे आगमन झाले. त्यात हरिद्वार येथील श्री संत मंडळाचे स्वामी राममुनीजी महाराज आणि मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्याचे राकेशगिरीजी महाराज होते.

जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष २०१८ मध्ये ३११ आतंकवादी ठार

जम्मू आणि काश्मीरमध्ये वर्ष २०१८ मध्ये सुरक्षादलांनी ३११ जिहादी आतंकवाद्यांना ठार केले, अशी माहिती सैन्याकडून प्राप्त झाली आहे. गेल्या एका दशकातील ही सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने आतंकवादी एका वर्षात ठार झाले नव्हते. वर्ष २०१० मध्ये २३२ आतंकवादी ठार झाले होते.

(म्हणे) गोशाळेमुळे उपद्रव होतो आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात !

स्वतः शंखवाळी येथे पुरातत्व खात्याच्या जागेत अनधिकृतपणे चर्च उभारली असतांना फादर लुईस आल्वारिस यांची आरोग्यमंत्र्यांकडे ७० वर्षांपासून येथे असलेल्या स्थानिक गोशाळेच्या विरोधात मात्र तक्रार !

डॉक्टर आणि रुग्णालये यांवरील आक्रमणे रोखण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून खासगी विधेयक सादर

डॉक्टर आणि रुग्णालयांवरील वाढती आक्रमणे रोखण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या सध्या चालू असलेल्या अधिवेशनात २८ डिसेंबरला एक खासगी विधेयक मांडले.

राजकीय आणि व्यावसायिक विज्ञापनांना लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आणलेल्या धोरणाला स्थायी समितीकडून अनुमती नाही !

बॅनर, होर्डींग्स यांच्या साहाय्याने प्रसिद्धी करणार्‍या राजकीय आणि व्यावसायिक विज्ञापनांना लगाम घालण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आणलेल्या धोरणाला ‘स्थायी समिती’ने अनुमती दिली नाही. गेली २ वर्षे हे धोरण लांबणीवर टाकण्यात आले आहे.

(म्हणे) ‘समाजात तेढ निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील !’- कोरेगाव भीमा येथील स्तंभाला भेट दिल्यानंतर भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ या दिवशी दंगल घडवणार्‍यांवर सरकारकडून अद्याप कारवाई करण्यात आली नाही. समाजात तेढ कशी निर्माण होईल आणि दंगल कशी घडेल, हेच सरकार पहात आहे, असा आरोप भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

अवैध मद्यविक्री उजेडात आणण्यासाठी गेलेल्या महिलांवर मद्य विक्रेत्यांचे जीवघेणे आक्रमण

शहापूर (कराड) येथील अवैध मद्य विक्रीविषयी गावातील महिलांनी संघटित होऊन मोहीम चालू केली आहे. याविषयी मुख्यमंत्री, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांना निवेदने देण्यात आली

जुळेवाडी आणि कांचनपूर येथील ग्रामबैठकांमध्ये हिंदु राष्ट्र जागृतीसाठी कार्य करण्याचा निर्धार !

तासगाव येथे १० फेब्रुवारी २०१९ या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्‍वभूमीवर जुळेवाडी आणि कांचनपूर येथे झालेल्या ग्राम बैठकांमध्ये धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या बैठकांमध्ये हिंदु राष्ट्र जागृतीसाठी कार्य करणार्‍या निर्धार करण्यात आला.              


Multi Language |Offline reading | PDF