(म्हणे) ‘न्यायालयाच्या निर्णयापूर्वी राममंदिरासाठी अध्यादेश नाही !’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाने यावर निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एएन्आय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या या वर्षातील पहिल्या मुलाखतीत प्रथमच दिले आहे.

प्रत्येक भारतियाच्या डोक्यावर ६२ सहस्र रुपयांचे कर्ज

प्रत्येक भारतियाच्या डोक्यावर तब्बल ६२ सहस्र रुपये एवढे कर्ज आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने सरकारवर असलेल्या कर्जासंबंधीच्या दिलेल्या तिमाही अहवालावरून समोर आली आहे.

पाकिस्तानी कारागृहांमध्ये ५३७ भारतीय बंदिवान

पाकच्या कारागृहांमध्ये ५३७ भारतीय बंदिवान असल्याचीही माहिती या वेळी देण्यात आली. ‘या बंदिवानांची सुटका करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार काय प्रयत्न करत आहे’, हे त्याने सांगायला हवे !

(म्हणे) ‘माझी जात आणि माझा समाज यांसाठी कार्य करणे, हे माझे प्रथम कर्तव्य !’ – राजस्थानच्या काँग्रेसच्या महिला आणि बालविकास राज्यमंत्री ममता भूपेश

आमचे प्रथम कर्तव्य हे आमच्या जातीसाठी, त्यानंतर आमच्या समाजासाठी; मग सर्व समाजासाठी असेल. सर्वांसाठी आम्ही काम करावे, अशी आमची इच्छा आहे.

ब्रिटनमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री जिहादी आतंकवाद्याकडून ‘अल्ला अल्ला’ म्हणत नागरिकांवर आक्रमण

मँचेस्टर शहरातील व्हिक्टोरिया रेल्वेस्थानकात जिहादी आतंकवाद्याने ३१ डिसेंबरला म्हणजेच ख्रिस्ती नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘अल्ला अल्ला’ असे ओरडत नागरिकांवर चाकूने आक्रमण केले.

अवैध कृत्ये करणार्‍या किंवा विखारी वक्तव्य करणार्‍या धर्मांध नेत्यांना नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठांना नोटीस बजावणारे पोलीस !

‘एका जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठांनी एका सभेचे आयोजन केले होते. पोलिसांनी या सभेला अनुमती देतांना हिंदुत्वनिष्ठांना कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरून नोटीसही दिली.

पर्यटनासाठी आलेल्या चिनी तरुणीवर खजुराहो येथे सामूहिक बलात्कार

भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका २५ वर्षीय चिनी तरुणीवर मध्यप्रदेशमधील खजुराहो येथे सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

इस्लामाबादमध्ये भारतीय राजनैतिक अधिकार्‍याच्या घराचा वीजपुरवठा खंडित

पाकिस्तान सरकारकडून तेथील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांचा छळ चालूच आहे. एका भारतीय राजनैतिक अधिकार्‍याच्या इस्लामाबाद येथील घरातील वीजपुरवठा ४ घंटे खंडित करण्यात आला होता.

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागतासाठी केलेल्या गोळीबारात लहान मुलाचा मृत्यू

येथील उस्मानपूर भागात ख्रिस्ती नववर्षाचे स्वागत करतांना एकाने हवेत गोळीबार केला. या गोळीबारात एका १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.


Multi Language |Offline reading | PDF