शहापूर (जिल्हा ठाणे) येथे महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या अनुदानित गोशाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला !

येथील अघई गावातील ‘जंगली महाराज आश्रम ट्रस्ट’च्या गोशाळेला ५० लक्ष रुपये अनुदान देण्याचा सोहळा पशूसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते २९ डिसेंबरला पार पडला. ५० लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झालेली ही महाराष्ट्रातील पहिली गोशाळा असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला आमचे समर्थन ! – सभेला उपस्थित धर्मप्रेमींची ग्वाही

तालुक्यातील तरंदळे येथील ग्रामदेवता श्री टेवणादेवी मंदिराच्या प्रांगणात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस धर्माभिमानी हिदूंचा चांगला प्रतिसाद लाभला.

मुंबई येथील जे.जे. रुग्णालयामध्ये खासगी पॅथालॉजीच्या दलालांकडून रुग्णांची लूट

येथील जे.जे. रुग्णालयामध्ये बहुतांश वैद्यकीय चाचण्या निःशुल्क, तर काही चाचण्या अल्प दरांमध्ये केल्या जातात; परंतु सध्या रुग्णालयामध्ये तपासणी किट नसल्याने खासगी पॅथालॉजीचे दलाल लुबाडत आहेत.

इजिप्तमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांच्या कारवाईत ४० आतंकवादी ठार

गिझा पिरॅमिडजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर इजिप्तच्या पोलिसांनी २९ डिसेंबरला विविध ठिकाणी टाकलेल्या छाडींमध्ये ४० संशयित आतंकवाद्यांना ठार केले. यातील २ छापे गिझा भागात टाकण्यात आले….

भिवंडीत कपड्याच्या कारखान्याला भीषण आग

भिवंडीच्या एम्आयडीसीतील ‘उजागर डाईंग’ या कापडाच्या कारखान्याला ३१ डिसेंबरला भीषण आग लागली. या आगीत १२ ते १३ डाईंग जळून खाक झाले आहेत.

ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे ! – मुख्यमंत्री

अंमलबजावणी संचालनालयाने (‘इडी’) ऑगस्टा वेस्टलॅण्ड घोटाळ्यातील महत्त्वाचा दुवा असलेला ख्रिश्‍चिअन मिशेल याची भारतात आणून चौकशी केली. या चौकशीत मिशेल याने लाचखोरांच्या सूचीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या…..

हसीना जिंकल्या; पण …

खालीदा झिया यांच्या बांगलादेश नेशनॅलिस्ट पार्टी ही हिंदुविरोधी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे. हसीना या सौम्यभाषी, तेथील अल्पसंख्यांकांच्या बाजूने बोलणार्‍या आणि त्यांच्या विरोधात होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या म्हणून ओळखल्या जात होत्या.

रानमळा (धुळे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

जिल्ह्यातील रानमळा गावात २७ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रानमळा गावातील १५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मोहीम !

देशभरात नववर्ष गुढीपाडव्याला साजरे न करता ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे.

भीम आर्मीचे आझाद यांना पुणे येथे कार्यक्रम घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली !

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद उपाख्य उर्फ रावण यांच्या पुणे येथील सभेला मुंबई उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली आहे. पुणे प्रशासनाने ३० डिसेंबर या दिवशी होणार्‍या पुण्यातील एस्एस्पीएम्एस् मैदानावरील राज्यस्तरीय भीमा कोरेगाव ….


Multi Language |Offline reading | PDF