ठाणे, मुंबईला पाठवण्यात येणारा शस्त्रसाठा कह्यात; दोन धर्मांध अटकेत

ठाणे आणि मुंबई येथे पाठवण्यात येणार्‍या मोठ्या शस्त्रसाठ्यासह दोन धर्मांधांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. शोएब इसाक शेख आणि रहीम शेख हे अमरावती येथील शीतल हॉटेलमध्ये शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती…………

सहा बांगलादेशी घुसखोरांना ठाणे न्यायालयाने सुनावली शिक्षा !

येथील न्यायालयाने भिवंडी येथे धाड टाकून कह्यात घेतलेल्या सहा बांगलादेशी घुसखोरांना चार वर्षे कारावास आणि प्रत्येकी ५ सहस्र रुपयांची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन्.एच्. मखारे यांनी सुनावली आहे.

(म्हणे) ‘देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे मुसलमान बांधव अस्वस्थ !’ – डॉ. लक्ष्मीकांत देशमुख

देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे मुसलमान बांधव अस्वस्थ आहेत. सर्वसामान्य मुसलमान शांततावादी आहेत, दहशतवादी नव्हेत, असे विधान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे.

मुंबई येथे शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या पानाच्या टपर्‍यांवर कारवाई करा !

शाळेच्या २०० मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ आणि पान यांच्या विक्रीवर बंदी असूनही या पदार्थांची पानाच्या टपर्‍यांवर विक्री होत असून या दुकानांवर कारवाई होत नसल्याने मुले व्यसनाच्या आहारी गेली आहेत…..

योगमुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्‍व जोडण्याचे काम होत आहे ! – राष्ट्रपती

योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली अमूल्य देणगी असून त्यामुळे मनुष्य, समाज, देश आणि विश्‍व जोडण्याचे काम होत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपी चालकांची तपासणी करण्याचा पोलिसांना आदेश

३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांची तपासणी करण्याचा आदेश पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी ३१ डिसेंबरला राज्यभरातील पोलिसांना दिला.

मुंबईत अनुमाने २१६ अवैध शाळा असल्याची शिक्षण समिती सदस्यांची माहिती

मुंबईत अनुमाने २१६ प्राथमिक शाळा अवैध असल्याची माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी उघड केली. त्यांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा फलक शाळेबाहेर लावण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले आहेत; मात्र त्यांच्यावर कारवाई करणे तर दूरच फलकही लावण्यात आले नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या ९२ परदेश दौर्‍यांवर २ सहस्र २१ कोटी रुपये खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत ९२ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण २ सहस्र २१ कोटी रुपये खर्च आला.  यामध्ये पंतप्रधानांच्या हॉटेल आणि अन्य लवाजमा यांच्या खर्चाचा समावेश नाही.

प्रसुती शस्त्रकर्मात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी १२ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश

भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी १९९९ या वर्षी एक महिलेची प्रसुती शस्त्रकर्मद्वारे करणे आवश्यक असतांनाही ती नैसर्गिक पद्धतीने केली. त्यामुळे नवजात बाळाला कायमचे अपंगत्व आले……

जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची कार्यवाही न केल्यावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस

जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम २०१६ची कार्यवाही न केल्यावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


Multi Language |Offline reading | PDF