बनावट मुद्रांक घोटाळ्यातील सर्व आरोपींची १५ वर्षांनंतर पुराव्याच्या अभावी मुक्तता !

देशातील बहुचर्चित बनावट मुद्रांक घोटाळ्यातील सर्व आरोपींची येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ३१ डिसेंबरला भक्कम पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता केली. तब्बल १५ वर्षांनी निकाल लागून आरोपींची निर्दोष मुक्तता होत असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ?

भारतियांना ४३२ कोटी रुपयांची लाच देण्यात आली ! – सीबीआयचा दावा

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल आणि गुइडो हाश्के यांनी भारतियांना ४३२ कोटी रुपयांची लाच दिली, असा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून पित्याची त्याच्या मृत्यूच्या १० मासांनंतर निर्दोष मुक्तता

बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात निर्दोष असणार्‍यास २२ वर्षांनी न्याय मिळत असेल आणि तोपर्यंत त्याचे निधन झाले असेल, तर याला न्याय म्हणता येईल का ? २२ वर्षे ही व्यक्ती ‘बलात्कारी’ म्हणून समाजाच्या द्वेषाला कारणीभूत झाली.

घुसखोरी करणारे २ पाक सैनिक ठार

‘१-२ सैनिकांना नव्हे, तर पाकच्या संपूर्ण सैन्याला नष्ट केल्याविना भारताला शांतता मिळणार नाही’, हे भारतीय शासनकर्ते जाणतील आणि त्या अनुषंगाने ते कृती करतील, तो भारतियांसाठी सुदिन म्हणावा लागेल !

पाकिस्तान भारतीय सीमेवर ६०० रणगाडे तैनात करणार

पाक भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला अधिक सशक्त करण्यासाठी आणखी ६०० रणगाडे तैनात करणार आहे, अशी माहिती भारतीय सैन्याच्या सूत्रांनी आणि गुप्तचरांनी दिली आहे.

नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना २५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यास भाजप सरकारची साईबाबा संस्थानला अनुमती !

मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठीच वापरला जावा, असे धर्मशास्त्र सांगते. अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांचा पैसा घेण्याचे धैर्य महाराष्ट्रातील भाजप सरकार का दाखवत नाही ? सरकारी कार्यालयात देवतांच्या प्रतिमांना विरोध करणार्‍यांना मंदिरांचा पैसा का लागतो ?

वर्ष २०१७-१८ मध्ये घोटाळेबाजांनी बँकांचे ४१ सहस्र १६७ कोटी रुपये लुटले !

वर्ष २०१७-१८ मध्ये विविध घोटाळ्यांमधून बँकांचे ४१ सहस्र १६७ कोटी रुपये लुटण्यात आले, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता हा आकडा ७२ टक्क्यांनी अधिक आहे.

प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी ३२४ वर्षे लागतील

देशातील विविध कनिष्ठ न्यायालयांमध्ये ६० वर्षांहून प्रलंबित असणारे १४० खटले आहेत. भारतीय न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते; मात्र त्यात सुधारणा व्हावी, यासाठी ७१ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तिची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे !

रामराज्य आल्यास देश आणि विश्‍व सुखी होईल ! – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देशात उत्तम शासन आणि प्रजेचे योगक्षेम यांसाठी रामराज्य स्थापन झाले, तर देश अन् विश्‍व सुखी होऊ शकेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे केले. ते पेजावर श्रीकृष्ण मठाला भेट दिल्यानंतर बोलत होते.

गुजरातमध्ये हनुमानाच्या मूर्तीला सांताक्लॉजसारखा पोषाख 

गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील हनुमान मंदिरात मूर्तीला सांताक्लॉजसारखे कपडे घातल्याने येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला आहे. हनुमानाच्या मूर्तीला परिधान केलेले हे कपडे काढून दुसरे कपडे घालावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF