‘बुलेट ट्रेन’ आणण्याऐवजी आहे ती रेल्वे प्रथम सुधारा !

प्रथम भारतीय रेल्वे सुरळीत करा, प्रवाशांना त्यातून योग्य त्या सुविधा द्या अन् मग ‘बुलेट ट्रेन’चे स्वप्न पहा, असे भाजपच्या पंजाबमधील ज्येष्ठ नेत्या आणि माजी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांता चावला यांनी म्हटले आहे. चावला यांनी नुकताच अमृतसर ते अयोध्या असा प्रवास केला होता.

श्रीनगरमध्ये जामिया मशिदीवर इस्लामिक स्टेटचे झेंडे फडकावले

येथील जामिया मशिदीवर पुन्हा एकदा शुक्रवार, २८ डिसेंबरला रात्री काही देशद्रोही धर्मांधांकडून इस्लामिक स्टेटचे झेंड फडकावण्यात आले. याची चित्रफीत सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहे. या वेळी देशविरोधी घोषणाही देण्यात आल्या…

जुन्या घराची खरेदी-विक्री करतांना आता ‘स्टॅम्प ड्युटी’ लागू होणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

जुने घर खरेदी-विक्री करतांना जुन्या कागदपत्रांवर आता ‘स्टॅम्प ड्युटी’ लागू होणार नाही. एका घरावर एकदाच स्टॅम्प ड्युटी आकारता येईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या निकालातून स्पष्ट झाले आहे. तसे आदेशच स्टॅम्प ड्युटी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पुणे आणि धाराशिव येथून १६ टन गोमांस जप्त

महाराष्ट्रात सर्वत्र गोवंश हत्याबंदी कायदा असूनही कसायांना त्याचे अजिबात भय वाटत नसल्याचे कटू सत्य समोर आले आहे. परंडा (धाराशिव) येथे गोमांसाने भरलेले आणि बाहेरून देखाव्यापुरती भुशाची पोती लावलेले १० टन गोमांस असलेले २, तळेगाव दाभाडे येथून ६ टन गोमांस असलेला एक आणि चाकण येथून ८०० किलो गोमांस असलेला एक टेम्पो पोलिसांनी कह्यात घेतला आहे.

शिमला येथे गोवंशाचे अवशेष मिळाल्याने जमावाकडून १८ दुकानांची तोडफोड

शिमला जिल्ह्यातील रोहडू बाजारातील एका घराच्या छतावर गोवंशाचे अवशेष सापडल्याने झालेल्या हिंसाचारात मुसलमानांच्या १८ दुकानांची तोडफोड करण्यात आली. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला.

बेरोजगार व्यक्तींच्या बँक खात्यात प्रतिमहा २ सहस्र रुपये जमा करण्याची योजना कार्यान्वित करण्याविषयी भाजप सरकार विचाराधीन

३ राज्यांतील विधानसभा निवडणुकांत झालेला पराभव आणि पुढील वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुका या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील भाजप सरकार ‘युबीआय’ (युनिव्हर्सल बेसीक इन्कम) नावाची एक योजना आणण्याच्या प्रयत्नात आहे.

मॅटने बडतर्फीचे आदेश दिलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई नाही !  धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते

मॅटने भ्रष्ट मार्गाने सेवेत आलेल्या अधिकार्‍यांच्या बडतर्फीचे आदेश देऊनही या अधिकार्‍यांवर कारवाई न करता त्यांना संरक्षण का दिले जात आहे ?, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे सरकारच्या वरील कामकाजासह अन्य कामांवरही जाब विचारला आहे.

उल्हासनगर येथे घरफोडी करणार्‍या धर्मांध महिलेला अटक

बुरखा घालून कपडे शिवण्याच्या बहाण्याने इमारतीमध्ये शिरून बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून जवळपास तीन घरफोड्या करणार्‍या शिरीन नुराआली शेख (३३) या धर्मांध महिलेला अटक करण्यात आली.

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयाच्या आवारात सरस्वतीदेवीचे लहान मंदिर उभारण्याची विद्यार्थी नेत्याची मागणी

येथील अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयातील विद्यार्थी नेते अजय सिंह यांनी विश्‍वविद्यालयाच्या परिसरात सरस्वतीदेवीचे लहान मंदिर बांधण्याची मागणी कुलपतींना पत्र लिहून केली आहे. तसेच गुरुद्वारा आणि चर्चही बनवण्याची मागणी केली आहे. याचे सकारात्मक परिणाम होतील, असे त्यांनी यात म्हटले आहे.

यापुढे राजकारण्यांच्या शिफारसीवर कर्मचार्‍यांच्या बदल्या करणार नाही !

यापुढे आमदार, खासदार किंवा राजकीय पक्ष यांच्या शिफारसींवर कोणत्याही सरकारी कर्मचार्‍याची बदली करणार नाही. ‘सिव्हिल ट्रान्सफर बोर्ड’ नेमले असून या बोर्डाच्या शिफारसींनुसारच सरकारी कर्मचार्‍यांची बदली करण्यात येईल, अशी भूमिका राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयात घेतली आहे.


Multi Language |Offline reading | PDF