सीबीआयचे मुंबई कार्यालय प्रमुख नंदकुमार नायर यांची चौकशी करण्याचा पंतप्रधान कार्यालयाचा आदेश

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) मुंबई कार्यालय प्रमुख नंदकुमार नायर यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला निर्देश दिले आहेत, असे वृत्त ‘दी फ्री प्रेस जर्नल’ या दैनिकात प्रसिद्ध झाले आहे.

दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल यांनी चौकशीत सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची ‘ईडी’ची माहिती

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्‍चिअन मिशेल यांनी कोठडीत सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) न्यायालयात दिली.

सीबीआयचे अन्वेषण पूर्वनियोजित कहाणी रचून, तसेच राजकारण्यांना गोवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ! – न्यायालयाचे मत

बहुचर्चित गुन्हेगार सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी आणि साथीदार तुलसी प्रजापती यांना बनावट चकमकीत ठार मारल्याच्या प्रकरणाचे सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) केलेले अन्वेषण पूर्वनियोजित कहाणी रचून केलेले आहे.

‘टी.व्ही. ९’ या वृत्तवाहिनीचे मालक, मुख्य संपादक, संचालक आणि निवेदक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘टी.व्ही. ९’ या मराठी वृत्तवाहिनीवरून ३० ऑगस्ट २०१८ या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणून ‘तो महाराष्ट्रातून एम्पीला पळून जाणार ?’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक कार्यक्रम प्रसारित करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.

यंदा कोरेगाव भीमा येथे आक्षेपार्ह पुस्तकविक्रीवर पोलिसांचे लक्ष

कोरेगाव भीमा येथे होणार्‍या पुस्तकविक्रीवर यंदा पोलीस लक्ष ठेवणार असून संवेदनशील साहित्याची विक्री होऊ नये, यासाठी विशेष अधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे.

हिंदुत्वनिष्ठांचा विरोध डावलून सरकार जादूटोणाविरोधी कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रचार आणि प्रसार समिती स्थापन करण्याच्या सिद्धतेत

जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रचार आणि प्रसार यांसह या कायद्याची परिणामकारक कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार

‘सनबर्न’ – एक धर्मविरोधी कार्यक्रम !

या कार्यक्रमाच्या आयोजकांनी शासनाला भरायचा कर बुडवला असूनही त्याच्या सादरीकरणाला शासनाकडून अनुमती दिली गेली आहे. अशा धर्मविरोधी कार्यक्रमाविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मांडलेले तेजस्वी विचार पुढे देत आहे.

मंत्रिमंडळ, वित्त विभाग यांच्या संमतीविना अवैधपणे शासन आदेश काढून राज्यातील ४ कृषी विद्यापिठांतील ८०० प्राध्यापकांना अवैध वेतनवाढ देत अनुमाने २५० कोटी रुपयांचा घोटाळा !

राज्यातील ४ कृषी विद्यापिठांतील ८०० प्राध्यापकांना मंत्रिमंडळ, वित्त विभाग यांच्या मान्यतेविना अवैधरित्या शासन आदेश काढून अवैधपणे वेतनवाढ देत अनुमाने २५० कोटी रुपयांचा घोटाळा करून सरकारी तिजोरीची लूट केली आहे. त्यात मंत्रालयातील अधिकार्‍यांचा सहभाग आहे.

राज्य सरकारने माजी मंत्री एकनाथ खडसे आणि डॉ. विजयकुमार गावित यांचे ५९ लाख रुपये थकीत घरभाडे माफ केले !

राज्य सरकारने माजी मंत्री एकनाथ खडसे आणि डॉ. विजयकुमार गावित यांचे ५९ लाख रुपये थकीत घरभाडे माफ करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम खात्यास दिल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

नववर्षाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदु जनजागृती समिती

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री धूम्रपान, मद्यपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे, वाहने वेगाने चालवणे, महिलांची छेड काढणे, कर्णकर्कश आवाजात अश्‍लील गाण्यांवर नाचणे, अशा गैरप्रकारांमध्ये कमालीची वाढ झालेली दिसते.


Multi Language |Offline reading | PDF