शबरीमलावरील निर्णय लवकर येतो, तर रामजन्मभूमीवरचा का नाही ? – केंद्रीय कायदेमंत्री

समलैंगिकतेवर ६ मासांत, शबरीमला प्रकरणात ५-६ मासांमध्ये, शहरी नक्षलवादावर २ मासांत निर्णय दिला जातो, तर रामजन्मभूमीवरील खटला ७० वर्षे का अडकला आहे ? गेली १० वर्षे सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे, तर सुनावणी का होत नाही ?

‘एन्आयए’कडून देहली आणि उत्तरप्रदेश येथे १७ ठिकाणी धाडी

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) आणि आतंकवादविरोधी पथक यांनी देहली अन् उत्तरप्रदेश येथील १७ ठिकाणी संयुक्तरित्या धाडी घालून इस्लामिक स्टेटचे ‘हरकत-उल-हर्ब-इस्लाम’ हे नवे ‘मॉड्युल’ (तळ) उघड केले आहे.

(म्हणे) ‘सत्र न्यायालयातील न्यायाधिशांच्या भरतीतही आरक्षणाची आवश्यकता !’ – कायदेमंत्री रविशंकर प्रसाद

न्यायाधिशांची भरती करतांना आतापर्यंत कोणतेही आरक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातींना या क्षेत्रात पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. तेव्हा या घटकांना न्यायव्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळावे म्हणून लोकसेवा आयोगाने…..

शिवसेनेची आक्रमकताच राममंदिर निर्माण करू शकते ! – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

अयोध्येतील राममंदिरप्रकरणी शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्य आहे. शिवसेनेची आक्रमकताच राममंदिर निर्माण करू शकते. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे राममंदिराचा प्रश्‍न सोडवल्याविना स्वस्थ बसणार नाहीत….

दहेगाव (जिल्हा वर्धा) येथे धर्माचार्य माऊली महाराज मुरेकर यांची वर्धा येथे पोलिसांत तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी २ दिवसांपूर्वी मनुस्मृतीचे दहन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी दहेगाव पोलीस ठाण्यात राष्ट्रीय वारकरी…..

भारताचे पुढील पंतप्रधान कोण असतील, हे सांगता येणे कठीण ! – योगऋषी रामदेवबाबा

देशातील राजकीय परिस्थिती काहीशी विचित्र आहे. त्यामुळे वर्ष २०१९ च्या निवडणुकीत काय होईल ? जनता कोणाला कौल देईल ? कोण पंतप्रधान होईल ?, हे सांगता येणे कठीण आहे, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले.

पंजाबमध्ये ‘खलिस्तान गदर फोर्स’ नावाची नवी आतंकवादी संघटना स्थापन करण्याचा पाकचा प्रयत्न

गेल्या मासामध्ये पंजाबच्या पतियाळा येथून अटक करण्यात आलेला खलिस्तानी आतंकवादी शबनमदीप सिंह याची पोलिसांनी कसून चौकशी केली. पाकची गुप्तचर संस्था आयएस्आयच्या सांगण्यावरून तो पंजाबमध्ये ‘खालिस्तान गदर फोर्स’ नावाची आतंकवादी ……

छत्तीसगडमधील काँग्रेसच्या मंत्रीमंडळात अशिक्षित मंत्र्याचा समावेश

छत्तीसगडच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील ९ मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. या सर्वांना राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी शपथ दिली. यात कवासी लखमा हे शपथ वाचू शकले नाहीत. त्यामुळे राज्यपाल सांगत होत्या, तसे लखमा म्हणत होते.

७ हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या अबिद पाशाला कर्नाटक सरकारने त्वरित अटक करावी !

मैसूरू येथे झालेल्या भाजप आणि बजरंग दल यांच्या ७ कार्यकर्त्यांच्या हत्या करणारा प्रमुख आरोपी आबिद पाशा अन् त्याचे सहकारी यांना अटक करण्याची कर्नाटक सरकारकडे मागणी करावी अन् हिंदूंविषयी संयुक्त आघाडी शासनाने अवलंबलेले दुटप्पी धोरणाचे खंडण करावे


Multi Language |Offline reading | PDF