(म्हणे) ‘अल्पसंख्यांकांना कशी वागणूक द्यायची, ते मोदी यांना दाखवून देऊ !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची दर्पोक्ती

इम्रान खान यांना विचारायला हवे की, पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंचा वंशसंहार का झाला ? बलुचिस्तानमध्ये बलुचींचा वंशसंहार का होत आहे ? पाकमधून हिंदू भारतात पलायन का करत आहेत ? काश्मीरमधील अल्पसंख्यांक हिंदूंना हाकलण्यासाठी पाकने आतंकवादी का निर्माण केले ?

राममंदिर केव्हाही बनले, तरी ते आम्हीच बांधणार ! – योगी आदित्यनाथ

पूर्वी काही जण भगवान राम हे ‘काल्पनिक’ असल्याचे सांगत होते; मात्र आता तेच लोक जानवे दाखवून त्यांचे गोत्र काय आहे, ते सगळीकडे सांगत फिरत आहेत. हिंदूंनी कोणत्याही भ्रमात राहू नये.

सैन्यातील शीख सैनिक आणि अधिकारी यांना ‘खलिस्तान’साठी भडकावण्याचा पाकचा प्रयत्न

पाक हा भारतातील शीख, मुसलमान, निधर्मीवादी, पुरोगामी यांना भारताच्या विरोधात भडकावण्याचा गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. असे असूनही पाकला समजेल या भाषेत धडा शिकवण्याचा प्रयत्न ना काँग्रेसने कधी केला आणि ना भाजप करत आहे !

तुर्कस्थानमध्ये धरणाच्या मार्गामध्ये येणार्‍या ६१० वर्षे जुन्या मशिदीचे स्थानांतर

इस्लामी देशात प्राचीन मशीद धरणामुळे दुसरीकडे स्थानांतर केली जाते, तर भारतात विकासाच्या मार्गात येणार्‍या मशिदी दुसरीकडे स्थानांतर करण्यास भारतातील मुसलमान विरोध का करतात ?

सैनिकांवर आक्रमण करण्याएवढे स्वातंत्र्य मिळूनही ते आणखीन किती हवे ? – अभिनेते अनुपम खेर

देशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या सैनिकांवर हात उचलण्याचे, तसेच काश्मीरमध्ये त्यांच्या वाहनांची अडवणूक करून आक्रमण करण्याचे धैर्य काही जण करत आहेत. यापेक्षा आणखीन किती स्वातंत्र्य त्यांना हवे आहे ?, असा रोखठोक प्रश्‍न अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना केला आहे.

यापुढे हनुमानाविषयी जातीवाचक विधान केल्यास खटला प्रविष्ट करू ! – हनुमान गढीचे महंत राजू दास

हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारे भाजप सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदूंच्या देवतांचे विडंबन रोखण्यासाठी काहीही करत नसल्यामुळेच हिंदूंच्या साधू-संतांना अशा प्रकारे पुढाकार घेण्याची वेळ आली आहे ! हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !

कोवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे येशूची प्रार्थना करण्यासाठी जमलेल्या लोकांवर आक्रमण : ११ लोक घायाळ !

चंदगड तालुक्यातील कोवाड येथे २३ डिसेंबरला येशूची प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमलेल्या समुदायावर घरात घुसून काही जणांनी आक्रमण केले. या आक्रमणात ११ लोक घायाळ झाले आहेत. त्यांना बेळगाव येथील के.एल्.ई रुग्णालय आणि स्थानिक रुग्णालय येथे उपचारासाठी हालवण्यात आले आहे. २३ डिसेंबरला दुपारी १२ वाजता ही घटना घडली.

शिरवळ (जिल्हा सातारा) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धडाडली हिंदुत्वाची तोफ

हिंदूसंघटन अन् हिंदु राष्ट्राची स्थापना या उद्देशांनी ज्ञानसंवर्धिनी शाळेच्या मैदानात आयोजित केलेली हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात पार पडली.

श्रीमती गडकरीआजी (वय ८५ वर्षे) आणि श्री. नेताजी जाधवआजोबा (वय ७७ वर्षे) यांनी ६३ टक्के, श्री. सुधाकर जोशीआजोबा (वय ८९ वर्षे) यांनी ६२ टक्के, तर श्रीमती शोभा कुंभार (वय ६५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली !

देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये दत्तजयंतीच्या मंगलदिनी म्हणजे २२ डिसेंबर २०१८ या दिवशी श्रीदत्तगुरूंच्या कृपेने ४ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची घोषणा पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी केली.

मोक्का लावण्यात आलेल्या दत्ता जाधव टोळीच्या दोषारोपपत्राला मान्यता

खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, चोरी, दरोडे, घरफोडी, सरकारी कामात अडथळा, बलात्कार असे ४४ गंभीर गुन्ह्यांची नोंद असणार्‍या दत्ता जाधव टोळीच्या दोषारोपपत्राला मान्यता मिळाली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF