काँग्रेसकडून राजस्थानमध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा !

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारनेही शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. राज्यातील शेतकर्‍यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार माफ करणार आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमीवर नमाजपठण करण्याची अनुमती मागणारी ‘अल्-रेहमान’ संघटनेची याचिका फेटाळली

अयोध्येतील रामजन्मभूमीवर मुसलमानांना नमाजपठणाची अनुमती मागणारी ‘अल्-रेहमान’ या संघटनेची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. समाजात द्वेष पसरवण्याच्या हेतूने, तसेच न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासाठीच ही याचिका …..

भाजपच्या बंगालमधील रथयात्रेला अखेर कोलकाता उच्च न्यायालयाची अनुमती

बंगालमध्ये भाजपकडून ‘लोकशाही वाचवा’ या अंंतर्गत काढण्यात येणार्‍या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने अनुमती दिली. त्यामुळे या रथयात्रेला अनुमती नाकारणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चपराक बसली आहे.

काँग्रेसने सर्वोच्च न्यायालय, सैन्य, कॅग आदींचा अपमान केला ! – पंतप्रधान मोदी

काँग्रेसने सर्वोच्च न्यायालय, सैन्य, महालेखापरीक्षक (कॅग) आदी संस्थांचा अपमान केला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘नमो अ‍ॅप’च्या साहाय्याने त्यांनी तमिळनाडू आणि पुद्दूचेरी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सीरियात इस्लामिक स्टेटविरुद्धच्या युद्धात विजय मिळवल्याची अमेरिकेची घोषणा

सीरियातील इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेविरुद्धच्या युद्धात आम्ही त्यांचा पराभव केला आहे. हे युद्ध आम्ही जिंकले आहे, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

अंमलबजावणी संचालनालयाकडून काँग्रेस नेते चिदंबरम् यांची चौकशी

‘आयएन्एक्स मीडिया’ प्रकरणात काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांची अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) १९ डिसेंबर या दिवशी चौकशी केली. ‘ईडी’कडून चिदंबरम् यांची प्रथमच चौकशी करण्यात आली.

राममंदिराचे काम पुढे नेईल, तोच देशावर राज्य करील !

मंदिर व्हावे, ही देशाची इच्छा होती; म्हणूनच भाजपला सत्तेवर आणले; पण मंदिराचे सूत्र इतर विषयांप्रमाणे ‘जुमलेबाजी’ ठरू लागल्याने भाजपचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. मंदिर संयमाने आणि सहमतीने उभारले जाणार नाही.

भृगु महर्षींनी सांगितल्याप्रमाणे कोलकाता येथील दक्षिणाकाली मंदिरात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते पूजाविधी

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील दक्षिणाकालीच्या मंदिरात जाऊन श्री महाकालीदेवीचे दर्शन घेतले अन् कुंकुमार्चन करत २१ लिंबांची माळ अर्पण केली.

श्री महाकालीदेवीची कृपा व्हावी आणि सर्व दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन व्हावे, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री महाकाली यज्ञ संपन्न !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, सर्व दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन व्हावे, सर्व साधकांचे भयहरण व्हावे, हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांना होणारे कायिक, वाचिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत


Multi Language |Offline reading | PDF