कुंभपर्वाच्या वेळी रेल्वेप्रवासावर लावला जाणारा अधिभार अखेर रहित !

हिंदु जनजागृती समितीने या विषयावर भारतभरात आंदोलने केली होती, तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्रालय यांनाही याविषयी अवगत केले होते. त्याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. आता भाविक नियमित शुल्काची तिकिटे विकत घेऊ शकतात.

आपल्यापेक्षा शाळकरी मुले बरी ! – लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पाचव्या दिवशीही सदस्यांनी विविध सूत्रांवरून गदारोळ घातला. त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली, तसेच ‘आपल्यापेक्षा शाळेतील मुले बरी’, अशा शब्दांत सदस्यांची कानउघाडणी केली.

(म्हणे) ‘बुरहान वानी याला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणायला हवे होते !’ – मेहबूबा मुफ्ती यांचे देशद्रोही विधान

हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी मारला गेला; पण त्याचे (देशद्रोही आणि विखारी) विचार आजही काश्मीर खोर्‍यात जिवंत आहेत. त्यामुळे त्याला जिवंत पकडून मुख्य प्रवाहात आणायला हवे होते, असे विधान जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले.

(म्हणे) ‘काश्मीरमधील (देशद्रोही) नागरिकांची हत्या ही जालियनवाला बागेतील घटनेप्रमाणे !’ – मार्कंडेय काटजू, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश

सैन्याने काश्मीरमधील पूलवामा भागात नुकत्याच झालेल्या एका चकमकीत आतंकवाद्यांना ठार केले होते. यानंतर आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ सैन्यावर चालून आलेले काही नागरिकही ठार झाले होते….

चीनमधील लांगफांग शहरात ख्रिसमसशी संबंधित साहित्याच्या विक्रीवर बंदी !

चीनने त्याच्या उत्तर भागातील लांगफांग या शहरात ख्रिसमसशी संबंधित साहित्याच्या विक्रीवर बंदी घातली. लांगफांग शहरात होणार्‍या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर कचरामुक्त रहाण्यासाठी चीन सरकारने हा कठोर निर्णय घेतला.

वर्षभरात भाजपला मिळाले १ सहस्र २७ कोटी रुपयांचे उत्पन्न !

आर्थिक वर्षं २०१७-१८ मध्ये भाजपला देणग्या आणि इतर स्रोत यांतून अनुमाने १ सहस्र २७ कोटी ३४ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. या रकमेपैकी भाजपने ७४ टक्के (७५८ कोटी ४७ लाख रुपये) निधी व्यय (खर्च) केला आहे.

पाकमध्ये सरबजीत सिंह हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची पुराव्याअभावी सुटका

पाकमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या खोट्या आरोपांच्या अंतर्गत तेथील कारागृहात खितपत पडलेले भारतीय नागरिक सरबजीत सिंह यांची वर्ष २०१३ मध्ये कारागृहात हत्या झाली होती.

राममंदिरासाठी अध्यादेश काढल्यास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ ! – मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

सरकारने अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसाठी अध्यादेश काढण्याचा, तसेच तलाकच्या विरोधात संसदेत कायदा करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यास न्यायालयात आव्हान देऊ, अशी धमकी ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने १७ डिसेंबर या दिवशी एका पत्रकार परिषदेत दिली.


Multi Language |Offline reading | PDF