काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना तब्बल ३४ वर्षांनंतर जन्मठेप !

देहलीत वर्ष १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस्. मुरलीधर आणि न्यायाधीश विनोद गोयल यांच्या खंडपिठाने काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना तब्बल ३४ वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच काँग्रेसचे कमलनाथ यांच्याकडून शेतकर्‍यांना कर्जमाफी

काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची १७ डिसेंबर या दिवशी शपथ घेतल्यानंतर २ घंट्यांत राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीची घोषणा केली. अधिकार प्राप्त होताच त्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या धारिकांवर स्वाक्षर्‍या केल्या.

‘चर्च ऑफ साउथ इंडिया’च्या आर्चबिशपना आंध्रप्रदेशमधून अटक

चर्चमधील सहस्रो कोटी रुपयांच्या अपहाराच्या प्रकरणी ‘चर्च ऑफ साउथ इंडिया’चे आर्चबिशप जी. देवाशीर्वादम् यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडीने) अटक केली. त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

लोकसभेत तलाकविरोधी विधेयक सादर

भाजप सरकारने लोकसभेत तलाकविरोधी विधेयक १७ डिसेंबर या दिवशी सादर केले. यापूर्वी हे विधेयक संमत करून घेण्यास सरकारला अपयश आले होते. त्यामुळे सरकारने याविषयीचा अध्यादेश लागू केला होता.

राज्यघटनेची प्रत घेऊन सोबत चाललो, तर नक्षलवादी आणि दंगेखोर आम्हाला जिवंत सोडणार आहेत का ?

जसे महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर यांची परंपरा तुम्ही मानता, तसे भारताला राम, कृष्ण या अवतारांसह छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरा आहे. क्षात्रधर्माची परंपरा आहे. स्वरक्षण हा अधिकार आहे. कोणी जर शस्त्र ठेवत असेल…..

प्रखर हिंदुत्वासाठी शिवचरित्राचा अभ्यास करा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

हिंदु समाजामध्ये हिंदुत्व निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सर्वांना आदर, अभिमान, प्रेम आहे; मात्र पालक त्यांच्या मुलांना शिवचरित्र वाचायला देत नाहीत. तसेच कुणीही शिवचरित्र विकत घेऊन वाचत नाही.

मद्यविक्री करणार्‍यांविरुद्ध गडचिरोलीतील ग्रामसभांत ग्रामस्थ आक्रमक

गडचिरोलीत मद्यबंदी असतांनाही आजूबाजूच्या गावांसमवेत भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतून मद्याची तस्करी अन् अवैध मद्यविक्री केली जाते. त्याविरुद्ध गडचिरोली जिल्ह्यात ग्रामसभांमधून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेपर्यंत सनातनचा एकही साधक स्वस्थ बसणार नाही ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

सध्या देशात होत असलेली धर्महानी पहाता धर्मकार्याची नितांत आवश्यकता असून हिंदुंसमोर उभ्या ठाकलेल्या अनेक समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करणे. असे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन होेईपर्यंत सनातनचा एकही साधक स्वस्थ बसणार नाही

नवीन पनवेल येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर लावलेला फलक !

पोलीसच चोरांना भितात कि काय ? असा प्रश्‍न यामुळे जनतेला पडला आहे ! पोलीस ठाण्यासमोरून वाहने चोरीला जातात, हे पोलिसांना कळते, तर पोलीस चोरांना पकडत का नाहीत ? कि वाहने उभी करू नयेत म्हणून पोलिसांनीच चोरांची भीती घातली आहे ?

हिंदूंनी धर्माचरण केल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

सध्या हिंदूंना धर्माचरण करण्यास लाज वाटते. पाश्‍चात्त्यांप्रमाणे इंग्रजी दिनांकानुसार मेणबत्या विझवून, केक कापून वाढदिवस साजरा केला जातो. त्याऐवजी हिंदु संस्कृतीनुसार जन्मतिथीला आरती ओवाळून वाढदिवस साजरा करायला हवा.


Multi Language |Offline reading | PDF