ख्रिस्तीबहुल मिझोरामचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्या शपथविधीच्या वेळी बायबलमधील पंक्तींचे उच्चारण !

चर्चशी घनिष्ठ संबंध असलेले ‘मिझो नॅशनल फ्रंट’चे अध्यक्ष झोरामथंगा यांनी मुख्यमंत्रीपदाची, तसेच त्यांच्या मंत्रीमंडळातील ११ सदस्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पालटण्यास श्री अंबाबाई भक्त समितीचा विरोध !

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर ३ वर्षांपूर्वी रासायनिक संवर्धन करण्यात आले आहे. त्यानंतर या मूर्तीला पुढील १०० वर्षे काहीही होणार नाही, अशी खात्री (गॅरंटी) देण्यात आली आहे.

चीन सीमेवरील भारतीय सैनिकांच्या चौक्यांवर शुद्ध पाणी आणि वीजपुरवठा यांचा अभाव

गृह मंत्रालयाच्या एका अहवालानुसार भारत-चीन सीमेवरील भारतीय सैनिकांच्या चौक्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे, तर दुसरीकडे चीनने भारतीय सीमेवर मूलभूत सुविधा असणारी व्यवस्था निर्माण केली आहे.

मध्यप्रदेशातील नवनिर्वाचित ३९ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे

मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नव्यानेच निवडून आलेल्या एकूण २३० लोकप्रतिनिधींपैकी ९४ जणांवर विविध गुन्हे प्रविष्ट आहेत. पैकी ४७ जणांवर गंभीर गुन्ह्यांचा ठपका आहे.

(म्हणे) ‘देशाचे हिंदु राष्ट्र झाल्यास फाळणीचा धोका !’ – कुमार केतकर, खासदार, राज्यसभा

जर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे देशाचे हिंदु राष्ट्र झाले, तर भविष्यात फाळणीचा धोका आहे, अशी मुक्ताफळे ज्येष्ठ संपादक आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी येथे उधळली.

शेतकर्‍यांना कर्जमाफी देणे, हा निवडणूक जिंकण्याचा सोपा मार्ग !

गेल्या २ वर्षांत झालेल्या ८ निवडणुकांचे निकाल पाहिले, तर शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन म्हणजे निवडणूक जिंकण्याची हमी, असेच सूत्र दिसून येत आहे.

शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणांवर निवडणूक आयोगाने बंदी आणावी ! – अर्थतज्ञ रघुराम राजन

निवडणूक घोषणापत्रामध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या घोषणेला स्थान असता कामा नये, असे सूचवणारे पत्र रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.

सीमा भागातील मराठी जनतेच्या लढ्याला पाठिंबा द्या !

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणी यांसह ८५० गावांतील मराठी भाषिक जनतेवर कर्नाटक सरकारकडून होत असलेले अत्याचार, दडपशाही, मराठी भाषेवरील अन्याय आणि मुस्कटदाबी यांची गंभीर नोंद घेऊन सीमा भागातील मराठी जनतेच्या लढ्याला पाठिंबा द्या

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्यावर अब्रूहानीचा दावा ठोकला !

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १३ डिसेंबरला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर अब्रूहानीचा दावा ठोकला आहे. १० नोव्हेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मुनगंटीवार यांच्यासह भाजप नेत्यांचे आंतरराष्ट्रीय तस्करांशी संबंध आहेत.

उजनी धरणातील पाणी मनुष्य आणि प्राणी यांना धोकादायक ! – सोलापूर विद्यापिठाचेे संशोधन

सोलापूर विद्यापिठाने केलेल्या संशोधनात उजनी धरणातील पाणी मनुष्य आणि जनावरे यांना पिण्यायोग्य नसल्याची माहिती समोर आली आहे. या चाचणीत पारा, शिसे आणि अनेक रासायनिक घटक आढळून आले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF