हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
उद्या रविवार, १६ डिसेंबर २०१८
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहा !

सरकारीकरण झालेल्या शनिशिंगणापूर देवस्थानावर ५ मासांनंतरही सरकारी विश्‍वस्त मंडळाची नेमणूक नाही !

जून २०१८ मध्ये सरकारने शनिशिंगणापूर देवस्थान कह्यात घेतले आहे; मात्र राज्य नियुक्त विश्‍वस्त मंडळाची नेमणूक न झाल्याने देवस्थानाच्या कारभारावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.

राफेल विमान खरेदीच्या व्यवहारात अनियमितता नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा भाजप सरकारला दिलासा

वायूदलाची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल विमानाच्या व्यवहारात कोणतीही अनियमितता नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबर या दिवशी दिलेल्या निकालात सांगितले.

भाजपशासित हिमाचल प्रदेश सरकारकडून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा !

भाजपशासित उत्तराखंडपाठोपाठ हिमाचल प्रदेश सरकारनेही गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला आहे. धर्मशाला येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे आमदार अनिरुद्ध सिंह यांनी हा प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवला, तर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी त्यास पाठिंबा दिला.

अमोल काळे, अमित डेगवेकर आणि राजेश बंगेरा यांना जामीन संमत

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केलेल्या संशयितांपैकी अमोल काळे, अमित डेगवेकर आणि राजेश बंगेरा यांना येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.एम्.ए. सय्यद यांनी १४  डिसेंबर या दिवशी जामीन संमत केला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात संत भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा संपन्न

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुरु तथा सनातनचे श्रद्धास्थान संत भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी तथा सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे १४ डिसेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदुत्वनिष्ठांना सुरक्षा न दिल्याने त्यांच्या हत्या होत आहेत ! – अधिवक्ता दत्तात्रेय नायक, कर्नाटक

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजात हिंदुत्वाचे कार्य करत आहेत; परंतु निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्‍या अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यास सर्वच राजकीय पक्षांची सरकारे विफल ठरली आहेत.

कर्नाटकात प्रसादातून विषबाधा : ११ जणांचा मृत्यू

चामराजनगर जिल्ह्यातील सुलवाडी किच्चुगुट्टी मरम्मा मंदिरात प्रसादातून विषबाधा होऊन ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतांमध्ये एका १५ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पास १ सहस्र ८५ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे नरडवे (तालुका कणकवली) येथील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पास १ सहस्र ८४ कोटी ६६ लक्ष रुपये खर्चाच्या प्रस्तावास ११ डिसेंबरला झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

पोर्तुगिजांनी गोवा सोडून जाण्यापूर्वी येथील साधनसुविधा नष्ट केल्याचे विधान योग्यच ! – सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाममंत्री

पोर्तुगिजांनी गोवा सोडून जाण्यापूर्वी येथील साधनसुविधा नष्ट केल्याच्या माझ्या विधानावर मी ठाम आहे; मात्र पोर्तुगाल देशाचे आता तांत्रिक साहाय्य घेतल्यास राज्याला कोणतीही हानी होणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF