फाळणीच्या वेळीच भारत ‘हिंदु राष्ट्र’ घोषित व्हायला हवा होता ! – मेघालय उच्च न्यायालय

अखंड भारताची धर्माच्या आधारे फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानने स्वत:ला ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून घोषित केले. त्याच वेळी भारतही ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हायला हवा होता; पण आपण धर्मनिरपेक्ष रहाणेच स्वीकारले, असे मत मेघालय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुदीप रंजन सेन यांनी नोंदवले.

कर्नाटकमध्ये श्रीराम सेनेच्या नेत्यावर धर्मांधांकडून आक्रमण

येथे हिंदुत्वाचे कार्य करणारे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष जयंत नायक यांच्यावर ३ धर्माधांनी १३ डिसेंबर या दिवशी धारधार शस्त्रांनी आक्रमण केले.

धर्मांधाकडून नांदगाव खंडेश्‍वर (जिल्हा अमरावती) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची घोर विटंबना !

येथील मातंगपुरा भागातील हनुमान मंदिरातील मूर्ती ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता धर्मांध सय्यद सज्जाद सय्यद इब्राहिम याने जवळच्या नाल्यात फेकली.

राजस्थान आणि मध्यप्रदेश येथे ‘नोटा’चा मोठ्या प्रमाणात वापर !

राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील विधानसभेच्या निवडणुकांत ‘नन ऑफ द अबाव्ह’ अर्थात् ‘नोटा’चा (नकाराधिकाराचा) मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे उघड झाले.

श्रीनगरमध्ये चकमकीत २ आतंकवादी ठार

बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात १३ डिसेंबर या दिवशी सुरक्षादलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले.

विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज स्थगित

विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे तिसर्‍या दिवसाचे (१३ डिसेंबर या दिवसाचे) कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.

निकालांच्या २ दिवसांनंतरही मुख्यमंत्री निश्‍चित करण्यात काँग्रेसला अपयश !

मागील मासात झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागून २ दिवस उलटूनही काँग्रेसला मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांचे मुख्यमंत्री निश्‍चित करण्यात अपयश आले.

हिंदु राष्ट्र-जागृती सभा : रविवार, दि. १६ डिसेंबर २०१८

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ! : रविवार, दि. १६ डिसेंबर २०१८
• कल्याण (प.)
• अंबरनाथ (पू.)

भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष ! – शरद पवार

४ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल पहाता भाजपविषयी लोकांनी स्पष्ट असंतोष व्यक्त केला आहे. या निकालाविषयी भाजप सोडून अन्य पक्षांमध्ये समाधान आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा मुख्य सूत्रधार आबिद पाशा याला अटक करा !

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आणि त्यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांचा सूत्रधार असणारा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा आबिद पाशा याला तत्परतेने अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी


Multi Language |Offline reading | PDF