मुख्यमंत्रीपदावरून मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन

मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांत सत्ता मिळाल्यानंतर तेथील मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेत्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन ! सत्ता मिळाल्याच्या दिवसापासूनच काँग्रेसमधील सुंदोपसुंदी दिसू लागली आहे. पुढील ५ वर्षांत ते कशा प्रकारचा कारभार करणार आहेत, हे आताच कळून येते !

‘पहले मंदिर फिर सरकार !’ – संसदेबाहेर शिवसेना खासदारांच्या घोषणा

५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर संसदेबाहेर शिवसेनेच्या खासदारांनी राममंदिराच्या समर्थनार्थ घोषणा …..

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची निवड चुकीची ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भाजप सरकारने आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची केली निवड ! या निवडीवर डॉ. स्वामी यांच्यासारखे राष्ट्रनिष्ठ नेते स्वपक्षाच्या निर्णयावर टीका करतात, त्या वेळी त्यात तथ्य असते; मात्र भाजप सरकार त्याकडे दुर्लक्ष करते.

शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी, तर २ हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाबंदी

१४ डिसेंबर या दिवशी शिवप्रतापदिन (अफझलखानवध दिन) असून सातारा जिल्ह्यात तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो; मात्र शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी जिल्हा पोलीस ……

डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि गौरी लंकेश या हत्यांच्या प्रकरणांत समान धागा आहे का ? – सर्वोच्च न्यायालयाचा सीबीआयला प्रश्‍न

डॉ. दाभोलकर, प्रा. कलबुर्गी, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश या हत्यांच्या प्रकरणात समान धागा आहे का ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वषेण करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआयला) विचारला.

ताजमहालच्या जवळून जाणारा प्राचीन मंदिराचा मार्ग बंद होऊ देणार नाही ! – विहिंप

ताजमहालच्या पश्‍चिम प्रवेशद्वाराजवळ यमुना नदीच्या किनार्‍यावर असणार्‍या दशहरा घाटावरील प्राचीन मंदिराचा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटना त्याला विरोध करत आहेत. भाजपच्याच राज्यात असे प्रकार का घडतात ?

(म्हणे) ‘अंमलबजावणी संचालनालयाच्या माध्यमातून माझ्या कुटुंबियांचा छळ !’ – रॉबर्ट वाड्रा यांचा आरोप

भ्रष्टाचाराची चौकशी केली जाणे म्हणजे वाड्रा यांना छळ वाटत असेल, तर काँग्रेसच्या राज्यात निरपराध साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्ट. कर्नल पुरोहित आदींचा ९ वर्षे कारागृहात डांबून करण्यात आलेल्या छळाला काय म्हणावे ?

लक्ष्मण माने यांना अटक न झाल्यास मराठा समाज रस्त्यावर उतरणार ! – मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजातील मुलींविषयी आक्षेपार्ह विधान करणारे लक्ष्मण माने यांचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घेऊन त्यांना ४८ घंट्यांच्या आत अटक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे …..

वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १६ राज्यांतील १०० जागांवर भाजपचा पराभव होण्याची शक्यता

५ राज्यांत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाल्यानंतर वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत अन्य कुठल्याही राजकीय गणितांचा विचार करत न बसता ‘हिंदुत्व’ या एकाच सूत्राला भाजप चिकटून राहिल्यास तो पुन्हा निवडून येईल.

सनातन संस्थेविरोधात अपकीर्तीजनक कार्यक्रम प्रसारित करणारे ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीचे मालक, मुख्य संपादक, संचालक, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि अपकीर्तीजनक वक्तव्ये करणारे राजेश चौरसिया यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल !

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीवरून २९ ऑगस्ट २०१८ या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणून ‘सनातन संमोहनाचं सत्य LIVE ! सनातन संस्थेचे माजी साधक LIVE!’ या मथळ्याखाली अपकीर्तीजनक कार्यक्रम प्रसारित करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.


Multi Language |Offline reading | PDF