भाजपचा हिंदुत्वविरहित विकास हिंदूंनी नाकारला : निवडणुकांत दारूण पराभव !

भाजपचा निवडणुकांत दारूण पराभव ! काहीही झाले, तरी काँग्रेस कधी स्वतःचा निधर्मीपणा (अर्थात् हिंदुद्वेष) सोडत नाही, याउलट भाजप कधीही हिंदुत्वाशी एकनिष्ठ रहात नाही; म्हणून हिंदूही भाजपच्या बाजूने ठामपणे उभे रहात नाहीत, हे भाजपच्या आतातरी लक्षात येईल का ?

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ४ पोलीस हुतात्मा

शोपियां जिल्ह्यात पोलिसांच्या चौकीवर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ४ पोलीस हुतात्मा झाले. झैनपोरा पोलीस चौकीवर ११ डिसेंबरला दुपारच्या सुमारास आतंकवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार चालू केला.

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांचा १७ सहस्रांहून अधिक मताधिक्याने विजय !

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे उमेदवार श्री. टी. राजासिंह यांचा गोशामहल मतदारसंघातून दणदणीत विजय झाला. श्री. राजासिंह यांना ६१ सहस्र ८५४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार एम्. मुकेश गौड यांनी ४४ सहस्र १२० मते मिळाली.

खासदार आणि आमदार यांच्या विरोधात ४ सहस्र फौजदारी खटले प्रलंबित

देशातील आजी आणि माजी खासदार अन् आमदार यांच्यावरील ३ दशकांपासून ४ सहस्र १२२ फौजदारी खटल्यांची सुनावणी विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींवर खटले प्रविष्ट होतात, हे लोकशाही निरर्थक ठरल्याचेच दर्शक होय !

स्वतंत्र खलिस्तानचा पुरस्कार करणार्‍या संशयित आतंकवाद्याला चाकण (जिल्हा पुणे) येथून अटक

स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कार करणार्‍या एका संशयित आतंकवाद्याला पुणे आतंकवादविरोधी पथकाने चाकण येथून ३ डिसेंबरला अटक केली होती. त्याला १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

देहलीतील हजरत निझामुद्दीन दर्ग्यात महिलांना प्रवेश का नाही ? – देहली उच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस

देहली येथील हजरत निझामुद्दीन दर्ग्यात महिलांना प्रवेश का नाही ?, असा प्रश्‍न देहली उच्च न्यायालयाने उपस्थित करत केंद्र, राज्य आणि हजरत निझामुद्दीन दर्गा ट्रस्ट यांना नोटीस ! शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणारे आता गप्प का आहेत ?

हिंदु राष्ट्र स्थापन होणे काळाची आवश्यकता आहे ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

नंदुरबार येथे आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला २ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र’ उपक्रम राबवणार !

विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय व्हावी, यासाठी त्यांच्या दैनंदिन पाठामध्ये पालट करून त्यात स्वच्छतेवर आधारित संदेशाचा समावेश करण्यात येणार आहे.

भूमींच्या कामांसह सहकारी संस्थांची प्रकरणे लवकर निकालात काढण्याचे आदेश !

भूमींच्या विविध कामांसह सहकारी संस्थांची प्रकरणे लवकर निकालात काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

ओला-उबर आस्थापनांकडून शासनाच्या निर्णयाची पायमल्ली

राज्यातील कोणत्याही व्यवसायात स्थानिकांना ८० टक्के रोजगार मिळणे हा शासननिर्णय असून, त्याची पायमल्ली ओला-उबर आस्थापनांकडून होत असल्याचा आरोप वाहतूक कामगार संघटनेने केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF