राममंदिरासाठी भीक मागत नसून सरकारने त्यासाठी कायदा करावा ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही भीक मागत नाही. सरकारने राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, असे प्रतिपादन के. सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथे केले.

काश्मीरमध्ये चकमकीत १४ वर्षांचा आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या मुजगुंड येथे सुरक्षादलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश आले. मृतांमध्ये मुदासीर नावाच्या आतंकवाद्याचा समावेश असून तो अवघा १४ वर्षांचा आहे.

जयपूर (राजस्थान) येथील श्रीमती गीतादेवी खेमका (वय ७६ वर्षे) संतपदी विराजमान !

श्रीमती गीतादेवी खेमका या सनातनचे संत पू. प्रदीप खेमका यांच्या मातोश्री  !

साहित्यिकांनी दुर्जनांच्या विरोधात लेखण्या उचलल्या पाहिजेत ! – संजय राऊत, शिवसेना नेते

सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवा करणारे, सार्वजनिक वाचनालये चालवणारे आदी कार्यकर्त्यांना समाजात स्थान नसून सर्वाधिक गुन्हे नोंद असणारे गुन्हेगार नगरसेवक होत आहेत.

सोलापूर येथे अवैध पशूवधगृहाविषयी बातमी प्रसारित केल्याच्या कारणावरून धर्मांधांचे पत्रकारावर प्राणघातक आक्रमण

अवैध पशूवधगृह आणि गोवंशहत्या यांची बातमी देणार्‍या पत्रकारांवर आक्रमणे होणे, हे धर्मांधांचा जोर वाढल्याचे लक्षण आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनकर्ते कठोर धोरण अवलंबणार कि नाही ?

मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआय आणि ईडी यांचे पथक ब्रिटनला मार्गस्थ

भारतीय बँकांना लुबाडून ब्रिटनमध्ये पसार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाविषयी १० डिसेंबरला ब्रिटनमधील न्यायालयात सुनावणी होणार आहे.

बुलंदशहरमधील घटना हा अपघात ! – योगी आदित्यनाथ

येथे जमावाकडून मारहाण झाल्याचे प्रकरण हा एक अपघात होता. या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई चालू असून दोषींना सोडले जाणार नाही, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.

अपुर्‍या कोळशामुळे महानिर्मिती २० लाख टन कोळसा परदेशातून आयात करणार !

कोल इंडियाकडून देशातील महानिर्मितीच्या वीजप्रकल्पांना अल्प प्रमाणात कोळसा पुरवला जात आहे. त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर होत आहे. लोकसभा निवडणूक आणि उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी यांमुळे महानिर्मितीने २० लाख टन कोळसा परदेशातून आयात……

रॉबर्ट वाड्रा यांचे निकटवर्तीय जगदीश शर्मा ‘ईडी’च्या कह्यात

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचे  निकटवर्तीय जगदीश शर्मा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ८ डिसेंबर या दिवशी कह्यात घेतले. अटकेपूर्वी शर्मा यांनी ‘वाड्रा यांना गोवले जात आहे’, असा आरोप केला.

राहुल गांधी यांची ‘ती’ मुलाखत ही ‘पेड न्यूज’च !

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ६ डिसेंबर या दिवशी भाग्यनगर येथील एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत ही ‘पेड न्यूज’ (पैसे घेऊन विशिष्ट बातमी प्रसिद्ध करून घेणे) होती. ‘पेड न्यूज’ देऊन राहुल गांधी यांनी मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला…..


Multi Language |Offline reading | PDF