नंदूरबार येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

नंदूरबार येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
रविवार, ९ डिसेंबर २०१८, सायं. ५.३० वा.
ठिकाण – नेहरू पुतळ्याजवळी जुने पोलीस ग्राऊड, नंदूरबार

गंगेच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास महाराज अचानक बेपत्ता !

गंगानदीच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करणारे संत गोपाल दास महाराज अचानक बेपत्ता झाले आहेत. २४ जूनपासून त्यांनी उपोषणाला आरंभ केला होता. भाजपशासित उत्तराखंडमधील डेहराडून येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.

उत्तराखंडमधील भाजप सरकारकडून धर्मद्रोही ‘केदारनाथ’ चित्रपटावर बंदी

उत्तराखंडमधील भाजप सरकारने वादग्रस्त तथा धर्मद्रोही ‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटावर बंदी घातली. या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार करण्यात आला असून काही दृश्यांतून हिंदूंच्या धार्मिक भावनाही दुखावण्यात आल्या असल्याचा…..

रावी नदीवरील धरणप्रकल्पाला भाजप सरकारची मान्यता : पाकला जाणारे पाणी भारत अडवणार !

१७ वर्षे रखडलेला प्रकल्प मार्गी  वर्ष २०२२ मध्ये धरण बांधून पूर्ण होणार ! कुठे भारताच्या कुरापती काढण्याची एकही संधी न सोडणारा पाक, तर कुठे पाकला कोंडीत पकडणार्‍या प्रकल्पाला १७ वर्षे साधी मान्यताही देऊ न शकणारे कणाहीन भारतीय सर्वपक्षीय शासनकर्ते !

पू. भिडेगुरुजी यांना जामीन संमत

आंब्याच्या उदाहरणातून पू. भिडेगुरुजींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे प्रकरण ! पू. भिडेगुरुजींच्या वक्तव्यातील आशयाचा विपर्यास करून पू. भिडेगुरुजींवर हिंदुद्वेष्ट्यांनी ‘त्यांच्या शेतातील आंबा खाल्ल्याने मुले होतात’ असे वक्तव्य केल्याचा हास्यास्पद आरोप करून राळ उठवली होती.

मायणी (जिल्हा सातारा) येथील श्री सिद्धनाथ यात्रेत करमणुकीच्या कार्यक्रमांवर बंदी

खटाव तालुक्यातील मायणी या गावातील श्री सिद्धनाथ यात्रेमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी देवाचे धार्मिक कार्यक्रम वगळता करमणुकीच्या कार्यक्रमांवर प्रशासनाने अनुमती नाकारली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’चे संपादक, प्रकाशक, मुद्रक आणि मालक यांच्यावर आणि अपकीर्तीकारक लेख लिहिणार्‍या ईशानप्रिया एम्.एस्. यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘हिंदुस्तान टाइम्स’ (मुंबई आवृत्ती) या इंग्रजी दैनिकाच्या ६ सप्टेंबर २०१८ या दिवशीच्या अंकात ‘From Obscurity to heart of conspiracy’ (अस्पष्टतेकडून षड्यंत्राच्या मुळाकडे) आणि ‘Inside the ashram lies a mesh of secrecy and rules’ …..

हनुमान मंदिरातून पुजार्‍याला बाहेर काढले

मुझफ्फरनगर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील पुजारी श्री. सच्चिदानंद यांना धक्काबुक्की करून मंदिरातून बाहेर काढल्याच्या प्रकरणात ‘वाल्मिकी क्रांती दल’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

अध्ययन निष्पत्तीच्या नावाखाली नेत्यांची प्रसिद्धी !

विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीच्या नावाखाली ‘कोणत्या इयत्तेतील विद्यार्थ्यांला काय यायला हवे’, याविषयी माहिती देणारी क्लिष्ट भाषेतील लिखाण असलेली आणि नेत्यांची छायाचित्रे असलेली पत्रके शिक्षण विभागाने घरोघरी वाटली.


Multi Language |Offline reading | PDF