‘क्षात्रधर्म साधना’ या ग्रंथात ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाचा उल्लेखही नसल्याने ‘एटीएस्’चे आरोप बिनबुडाचे ! – सनातन संस्था

नालासोपारा येथे कथितरित्या स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (‘एटीएस’ने) आरोपपत्र प्रविष्ट केल्याचे प्रसिद्धीपत्रक अत्यंत हास्यास्पद, सदोष आणि निषेधार्ह आहे. जर प्रसिद्धीपत्रक इतके सदोष आहे, तर प्रत्यक्षात आरोपपत्र किती सदोष असेल,

आरोपी क्रिश्‍चियन मिशेल यांचे वकीलपत्र घेतल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते अल्जो जोसेफ पक्षातून तडकाफडकी निलंबित

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर घोटाळ्याच्या प्रकरणी दुबईतून प्रत्यार्पण केलेले आरोपी क्रिश्‍चियन मिशेल यांचे वकीलपत्र घेतल्याच्या प्रकरणी युवक काँग्रेसचे नेते अल्जो जोसेफ यांना काँग्रेसने पक्षातून तडकाफडकी निलंबित केले.

(म्हणे) ‘सनातन संघटनेकडून शस्त्रप्रशिक्षण दिले जाते !’ – प्रकाश आंबेडकर यांचा जावईशोध

सनातन संघटनेकडून शस्त्रप्रशिक्षण दिले जाते. तसा त्यांचा ‘ट्रेनिंग फोर्स’ कार्यरत आहे; मात्र याकडे लक्ष दिले जात नाही, असा जावईशोध भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लावला.

‘केदारनाथ’ चित्रपटाच्या विरोधातील याचिका फेटाळली

‘केदारनाथ’ या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ‘पवित्र धार्मिक स्थळाच्या नावाने प्रेम कथा बनवणे चुकीचे आहे. या चित्रपटात वास्तवाचा विपर्यास करण्यात आला …..

‘व्यापमं’ घोटाळ्यातील आरोपीला काँग्रेसने दिले सरचिटणीसपद !

मध्यप्रदेशमधील बहुचर्चित ‘व्यावसायिक परीक्षा मंडळ’ अर्थात् ‘व्यापमं’ घोटाळ्यातील आरोपी संजीव सक्सेना यांना काँग्रेसने सरचिटणीसपद बहाल केले.  पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रप्रभाष शेखर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही नियुक्ती पक्षाध्यक्ष ……

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा नेता असीम शरीफ याचा जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आर्. रुद्रेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी तथा वादग्रस्त ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात् ‘पी.एफ्.आय.’चा नेता असीम शरीफ याने जामिनासाठी केलेला अर्ज राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या ….

संसदेत कायदा करून राममंदिर उभारावे आणि हिंदूंच्या श्रद्धेचा मान राखावा ! – समर्थभक्त कौस्तुभबुवा रामदासी

विद्यमान सरकारने संसदेत कायदा करून राममंदिर उभारावे आणि हिंदूंच्या श्रद्धेचा, अस्मितेचा मान राखावा, असे आवाहन मिरज येथील वेण्णास्वामी मठाचे मठाधिपती समर्थभक्त कौस्तुभबुवा रामदासी यांनी केले.

‘केदारनाथ’ चित्रपटातून हिंदु धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

१२ ज्योतिर्लिंगांपैकी १ असलेले ‘केदारनाथ’ हे पवित्र नाव चित्रपटाला का दिले ? ‘केदारनाथ’ हे गावाचे नाव नाही, तर देवळाचे नाव आहे. हा हिंदु धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न आहे. प्रलय येण्यासाठी कधी जप करत नाहीत. ‘प्रलय’ या शब्दाला गहन अर्थ आहे.

दुष्काळाचे कारण पुढे करत कर्नाटक सरकारकडून हंपी उत्सव रहित !

केवळ लांगूलचालनासाठी आणि प्रतिष्ठेसाठी टिपू सुलतानची जयंती उत्साहाने साजरी करणार्‍या कर्नाटक सरकारने हंपी उत्सव मात्र साजरा करण्यास निरुत्साह दाखवला आहे. दुष्काळाचे कारण पुढे करत हंपी उत्सव रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

(म्हणे) ‘मनुवादी’ रामाने ‘दलित’ हनुमानला गुलाम बनवले !’ – भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांचे हिंदुद्वेषी विधान

राम हे मनुवादी होते आणि हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते, असे वादग्रस्त विधान भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी येथे केले.


Multi Language |Offline reading | PDF