मंटूर आणि होनकल (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन

मंटूर (तालुका रायबाग) येथे २९ नोव्हेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. आसपासच्या ४ गावांतील ८० धर्मप्रेमी नागरिकांनी या सभेचा लाभ घेतला.

(म्हणे) ‘हेमंत करकरे यांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केली !’

हिंदु राष्ट्राच्या उभारणीसाठी आड येणारे हेमंत करकरे यांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केली, असे धादांत खोटे विधान राज्याचे माजी विशेष पोलीस महासंचालक एस्.एम्. मुश्रीफ यांनी केले आहे. सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कारसेवा करण्याची घोषणा करणार्‍या हिंदु समाज पक्षाच्या अध्यक्षांना अटक

अयोध्येत हिंदु समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी कारसेवा करण्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना नुकतीच अटक केली. त्यापाठोपाठ आता आणखी ४ जणांनाही पोलिसांनी अयोध्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली.

शांततेसाठी पाकने भारताला सहकार्य करावे ! – अमेरिका

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत आतंकवाद अन् काश्मीर सूत्रावरून तणाव असून दोन्ही देशात शांतता रहावी, यासाठी पाकिस्तानने भारताला सहकार्य करावे, अशी सूचना अमेरिकचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी पाकिस्तानला केली.

दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार रमेश औताडे यांना महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार घोषित !

ग्रामविकास प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) राजगुरुनगर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र ग्रामविकास गौरव पुरस्कार’ दैनिक पुण्यनगरीचे मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश औताडे यांना घोषित झाला आहे.

३१ डिसेंबर या दिवशी नववर्षोत्सवाच्या नावाखाली प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवा !

देशभरात सध्या पाश्‍चात्त्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या जागी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे.

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘ट्विटर’वर हँडल चालू !

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरवर @CyberDost या नावाने हँडल चालू केले आहे.

हिंदूंनी शतकानुशतके लढला रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी रक्तरंजित लढा !

हिंदूंनी ७७ वेळा संघर्ष करूनही रामजन्मभूमी मुक्तीच्या प्रतीक्षेत !

मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी घटनेनुसार ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. त्यामुळे आरक्षण रहित करावे, अशी याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती.

‘जीसॅट-११’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण : इंटरनेट वेगवान होणार

भारताच्या ‘जीसॅट-११’ या सर्वांत अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण ‘युरोपीयन अवकाश केंद्रा’च्या ‘फ्रेंच गुयाना’ येथून करण्यात आले. संपर्क उपग्रह असलेल्या या उपग्रहामुळे प्रति सेकंदाला ‘१०० जी.बी. ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी’ मिळणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF