केवळ २.१ टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या पनवेलमध्ये १६ चर्च !

एकूण लोकसंख्येत केवळ २.१ टक्के इतकी ख्रिस्ती लोकवस्ती असलेल्या पनवेल शहरामध्ये १६ मोठी चर्च उभारण्यात आली आहेत. ‘हाताच्या बोटावर मोजण्याइतके ख्रिस्ती असूनही या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्च कशासाठी आहेत ?

आतंकवादविरोधी पथकाचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट

नालासोपारा येथे कथित शस्त्रसाठा सापडल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने ५ डिसेंबर या दिवशी मुंबई येथील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात ६ सहस्र ८४३ पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले. ‘

आंबेडकरांचे नक्षली संबंध न्यायालयातच सिद्ध होतील ! – सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

भारिप-बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध आता न्यायालयातच सिद्ध होतील. त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेतच; पण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणार नाही….. – सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

वाराणसीतील संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी

वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे मिळालेल्या या धमकीमुळे वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे. वर्ष २००६ मध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटापेक्षाही मोठा स्फोट घडवून आणू…..

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – वारकरी संप्रदायाची महाअधिवेशनात मागणी

आळंदी येथे ४ डिसेंबरला येथील श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्य राज्यव्यापी चौदावे वारकरी महाअधिवेशन’ उत्साही वातावरणात पार पडले.

‘होय, मी हिंदू आहे’, असे अभिमानाने आणि ठणकावून सांगा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

आज छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, याचे चित्र लावण्यास बंदी केली जात आहे. हिंदूंना त्यांचा जाज्वल्य इतिहास सांगण्यास प्रतिबंध केला जात आहे.

शिर्डी देवस्थान निधी प्रकरणी शासनाने निर्णय मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात याचिका ! – संजय काळे, माहिती अधिकार कार्यकर्ते

निळवंडे कालव्यासाठी श्री साईबाबा संस्थानकडून ५०० कोटी रुपये कर्ज घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आजच्या स्थितीला साईबाबा संस्थानकडे केवळ १६०० कोटी रुपये शिल्लक आहेत. साईबाबा संस्थानचा शताब्दी महोत्सव संपलेला आहे.

सुरेश हावरे यांनी शासनाला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी आणि विनामुदत कर्ज कोणाला विचारून दिले ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

शिर्डी येथील श्री साई संस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी नुकतेच शासनाला सिंचन प्रकल्पाच्या कामांसाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज दिले. त्या कर्जाला व्याज, मुदत किंवा कशाचीही हमी नाही.

शिक्षणमंत्र्यांना मराठीचे धडे !

‘मराठी असे अमुची राजभाषा । जरी आज ती मायबोली नसे ॥’ ही कवितेची ओळ सर्वश्रुतच आहे; पण आज या राजभाषेचे अस्तित्वच मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सर्वधर्मसमभावापायी राममंदिर आणि बाबरी मशीद बाजूबाजूला बांधण्याचा घाट घालणार्‍यांना सडेतोड प्रत्युत्तर देणारे भाजपचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ !

श्रीराम हे हिंदूंचे आराध्य दैवत असून त्याची जन्मभूमी ही कोट्यवधी हिंदूंसाठी पवित्र आहे. त्यामुळे तेथे राममंदिराची निर्मिती होणे आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF