पंतप्रधानांच्या कानातून रक्त काढण्याची अकबरुद्दीन ओवैसी यांच्याकडून धमकी

ए चहावाल्या, आम्हाला डिवचू नकोस. ‘चहा-चहा’ करत ओरडत असतो. लक्षात ठेव, तुला इतके बोलीन, इतके बोलीन की, तुझ्या कानातून रक्त येईल, अशा अश्‍लाघ्य आणि चिथावणीखोर भाषेत एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …..

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येवरून नागरिकांचा उद्रेक

येथील स्याना येथे गायींचे अवशेष सापडल्याने संतप्त नागरिकांचा मोठा उद्रेक झाला. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांंनी घटनास्थळी धाव घेतली.

हिंदु जनजागृती समितीने मे २०१८ मध्येच शिर्डी देवस्थानाने निळवंडे धरणासाठी ५०० कोटी रुपये संमत केल्याचे केले होते उघड !

शिर्डी देवस्थानने ५०० कोटी रुपये निळवंडे धरणाच्या कामासाठी दिल्याचे प्रकरण : देवस्थानचा पैसा देऊन फडणवीस सरकार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी राजकीय साटेलोटे करत असल्याचाही हिंदु विधिज्ञ परिषदेने २४ मे २०१८ या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये केला होता आरोप !

चर्चमधील पाद्य्रांच्या समलैंगिकतेमुळे मी चिंतीत ! – पोप फ्रान्सिस

चर्चमधील पाद्य्रांच्या समलैंगिकतेमुळे मी चिंतीत आहे, असे विधान ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केले. एका स्पॅनिश पाद्य्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो, तर राममंदिरासाठी कायदा का होऊ शकत नाही ? – संघ

गुजरातमध्ये नर्मदेच्या तिरावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो, तर अयोध्येत राममंदिरासाठी कायदा का होऊ शकत नाही, असा प्रश्‍न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी उपस्थित केला.

देशातील २२३ नद्या प्रदूषित : गंगा आणि यमुना नदीत स्नान करणेही अशक्य !

देशातील २२३ नद्या अत्यंत प्रदूषित असून गंगा आणि यमुना या नद्यांमध्ये तर स्नान करणेही अशक्य असल्याचे समोर आले आहे. ‘जनसत्ता’ या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रविष्ट झालेल्या एका माहिती अधिकाराच्या प्रश्‍नांच्या उत्तरात ही माहिती उघड झाली.

शंखवाळी (गोवा) येथे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चर्चच्या समर्थनाने ख्रिस्त्यांचा भूमी हडप करण्याच्या कथित हेतूने धुडगूस !

‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ येथील फादर लुईस आल्वारिस यांनी चर्चमध्ये सकाळी आवाहन केल्यानंतर ही कृती करण्यात आली, तसेच पोलिसांनी या वेळी केवळ बघ्याची भूमिका घेऊन बागायतीत घुसून झाडे नष्ट करणार्‍या जमावावर कोणतीच कारवाई केली नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदरवासियांचे ३ दिवस गावाबाहेर वास्तव्य

चिंदर गावची गावपळण १ डिसेंबरपासून चालू झाली असून ग्रामदेवता श्री देव रवळनाथावरील श्रद्धेमुळे साडेचार सहस्र लोकवस्ती असलेले संपूर्ण गाव ३ दिवस आणि ३ रात्रींसाठी वेशीबाहेर वास्तव्याला गेले आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक ! – डॉ. बाबू नायक, बागलकोट

भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF