अयोध्येत राममंदिर बांधले, तर देहलीपासून काबूलपर्यंत विध्वंस घडवू ! – जैश-ए-महंमदची धमकी

अयोध्येत बाबराच्या मशिदीच्या जागी जर राममंदिर बांधले, तर देहलीपासून काबूलपर्यंत सर्वत्र विध्वंस घडवू, अशी धमकी ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याने दिली.

पठाणकोटमध्ये सैन्याच्या वेशातील ४ संशयित पोलिसांच्या कह्यात

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी सैन्याच्या वेशातील ४ संशयितांना कह्यात घेतले. हे चौघे जण हिमाचल प्रदेशची ‘नंबरप्लेट’ असलेल्या ‘स्कॉर्पियो’ या चारचाकी वाहनातून प्रवास करत होते.

जम्मू विद्यापिठातील प्राध्यापक तजुद्दिन यांच्याकडून क्रांतीकारक भगतसिंह यांचा ‘आतंकवादी’ असा उल्लेख !

जम्मू विद्यापिठातील प्राध्यापक महंमद तजुद्दिन यांनी क्रांतीकारक भगतसिंह यांचा ‘आतंकवादी’ असा उल्लेख केला. त्यामुळे विद्यापिठात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. तजुद्दिन यांनी ‘स्वातंत्र्याच्या काळात येथेही आतंकवाद होता.

राज्यातील बनावट पटसंख्या दाखवणार्‍या शाळांवर २ मासांत कारवाई करणार ! – शिक्षणमंत्री विनोद तावडे

राज्यातील बनावट पटसंख्या दाखवणार्‍या शाळांवर  उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे. येत्या २ मासांत ही प्रक्रिया पूर्ण करून दोषी आढळलेल्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल……

‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे !

मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांचे प्रेमप्रकरण दाखवून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे, यासाठी हिंदु जनता सभा आणि धर्माभिमानी यांची अधिवक्त्यांच्या वतीने केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला नोटीस !

डॉ. विनोद अनाव्रत लिखित ‘शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ या धर्मद्रोही पुस्तकावर शासनाने बंदी घालावी ! – आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

लेखक डॉ. विनोद अनाव्रत यांनी लिहिलेल्या ‘शिवाजीचे उदात्तीकरण : पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकातील लिखाण अत्यंत आक्षेपार्ह असून ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मलीन करणारे आणि कोट्यवधी शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे….

पोलिसांवरील आक्रमणांमध्ये वाढ, हा गृहखात्याचा पराभव ! – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचे दायित्व आहे. वर्ष २०१४ पासून पोलिसांवरील आक्रमणांमध्ये वाढ झाली असून हा गृहखात्याचा पराभव आहे. असेच चित्र राहिल्यास राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही.

कर्माला भक्तीची जोड दिली की ते सत्कर्म होते ! – स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज

जयसिंगपूर, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – माणसाने धार्मिक असले पाहिजे म्हणजे तो दक्ष म्हणजेच सावधान असला पाहिजे. आपण जेव्हा संतसंगतीत जातो, तेव्हा त्यातून बोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

विदर्भस्तरीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराचा भावपूर्ण वातावरणात समारोप !

अमरावती, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात चालू असलेल्या चार दिवसीय विदर्भस्तरीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराचा २६ नोव्हेंबर या दिवशी भावपूर्ण वातावरणात समारोप झाला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now