सानपाडा येथे मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी ५ सहस्रांहून अधिक हिंदू रस्त्यावर !

सानपाडा हा हिंदूबहुल भाग असतांनाही गेल्या १७ वर्षांपासून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मशीद बांधण्याचा हट्ट धर्मांधांकडून चालू आहे. धर्मांधांचे हे षड्यंत्र प्रत्येक वेळी तितक्याच ताकदीने हिंदूंनी उधळून लावले आहे.

(म्हणे)‘राममंदिर अयोध्येतच कशाला हवे ?’ – फारुख अब्दुल्ला यांचा हिंदुद्वेष

प्रभु रामचंद्र हे सर्वव्यापी आहेत आणि विश्‍ववंदनीय आहेत. त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच बांधले जावे, असा हट्ट कशासाठी धरला जातो, असा प्रश्‍न जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला.

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल सादर करण्यावरून विरोधकांचा प्रचंड गदारोळ आणि सभात्याग ! 

मराठा आरक्षणाच्या संदर्भातील अहवाल सभागृहात सादर करण्यावरून २७ नोव्हेंबरला विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला. विरोधकांच्या मागणीला विरोध करण्यासाठी सत्ताधार्‍यांनीही गोंधळ घातला.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी रेहाना फातिमा यांना अटक

हिंदूंच्या जगप्रसिद्ध शबरीमला मंदिरात बलपूर्वक घुसण्याचा प्रयत्न करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या मुसलमान महिलेला पथानामथिट्टा पोलिसांनी अटक केली.

काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक हुतात्मा

काश्मीरमधील कुलगाम येथील रेडवानी गावात सीमा सुरक्षा दलाचे सैनिक आणि आतंकवादी यांच्यात २७ नोव्हेंबरला सकाळी झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. यामध्ये एका सैनिकाला वीरमरण आले.

हिंदूंच्या तीर्थस्थळांचा अवमान करणार्‍या आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घाला !  हिंदूंची एकमुखी मागणी

‘केदारनाथ’ या आगामी हिंदी चित्रपटाचे नाव, पोस्टर, ‘ट्रेलर’ आणि ‘टीझर’ यांतून हा चित्रपट हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते. श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची घटना ही कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्यातच मनुष्य जीवनाची सफलता ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

हिंदु धर्माची श्रेष्ठता ही गुरु-शिष्य परंपरेतच आहे. जेव्हा जेव्हा आपल्या धर्माला, राष्ट्राला ग्लानी आली, तेव्हा तेव्हा गुरु-शिष्य हीच सनातन धर्मपरंपरा वाचवण्यासाठी पुढे आले.

शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीचा सुळसुळाट, अल्प दंडामुळे वाहनचालक मोकाट !

राज्यात शालेय विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीचा सुळसुळाट झाला असून त्यांना आकारण्यात येत असलेली दंडाची रक्कम अत्यल्प असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF