अयोध्याप्रकरणी काँग्रेस न्यायमूर्तींना महाभियोग चालवण्याची भीती दाखवत आहे ! – पंतप्रधान

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेव्हा अयोध्येसारख्या संवेदनशील प्रकरणावर न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार तथा अधिवक्ता न्यायमूर्तींच्या विरोधात महाभियोग चालवण्याची त्यांना भीती दाखवत होते.

राममंदिर बनवले नाही, तर विद्यमान सरकारही पुन्हा बनणार नाही ! – उद्धव ठाकरे

‘निवडणुकांना काही मास शिल्लक आहेत. या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. अध्यादेश आणा किंवा कायदा करा; पण राममंदिर बांधा’, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.

काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑल आउट’अंतर्गत ७२ घंट्यांत १६ आतंकवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलाच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहिमेला मोठे यश मिळाले असून ७२ घंट्यांत सैनिकांनी १६ आतंकवाद्यांचा खात्मा केला.

राममंदिरासाठी सरकारने कायदा करावा ! – सरसंघचालक

न्यायालयीन प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे अयोध्येत मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली.

केरळ येथे नाटकात मुलीने अजान दिल्याने मुसलमान संघटनांची निदर्शने

एका शाळेत आयोजित एका नाटकात मुलीने अजान दिल्याच्या विरोधात मुसलमानांनी निदर्शने केली.

सी.बी.आय.च्या अधिवक्त्यांचा अर्ज अभ्यासहीन ! – आरोपींच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद

गौरी लंकेश हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे’, असा उल्लेख केला आहे; मात्र आरोपींच्या वतीने युक्तीवाद करतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘सी.बी.आय.च्या अधिवक्त्यांचा हा अर्ज कसा अभ्यासहीन आहे’, हे दाखवून दिले होते.

‘दैनिक देशोन्नती’ आणि अपकीर्तीकारक वक्तव्ये करणारे काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘देशोन्नती’ या मराठी दैनिकाने २१ ऑगस्ट २०१८ या दिवशीच्या अंकात ‘सनातनसारख्या संस्था तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत आहेत’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली.

सज्जनांनी साधना करून आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावे ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह

महान हिंदु धर्माने दिलेली तत्त्वे आचरणात आणल्यास व्यावहारिक आणि पारमार्थिक उन्नती होते. हिंदु धर्म कधीही आतंकवाद निर्माण करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुलदेवतेचा नामजप केल्याने, तसेच गुरूंच्या आशीर्वादामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण केले.

देहलीत ३ आतंकवाद्यांना अटक

देहलीच्या विशेष पोलीस पथकाने ‘इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर’ (आय.एस्.जे.के.) या संघटनेच्या ३ आतंकवाद्यांना श्रीनगरमधील अवंतीपोरा येथून अटक केली.

श्री ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थान, पेरशेतवाडो, गिरी, म्हापसा येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभा !

ख्रिस्ती म्हणतात, भारताला ख्रिस्ती राष्ट्र करायचे आहे. धर्मांध म्हणतात, भारताला इस्लामिक राष्ट्र करायचे आहे. मग हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी का प्रयत्न करू नयेत ? हिंदु राष्ट्र ही व्यापक संकल्पना आहे.


Multi Language |Offline reading | PDF